- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
road-accident-in-telhara-town: अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच: तेल्हारा शहरात भीषण अपघात; तीन जागीच ठार, तीन गंभीर जखमी, तर दुसऱ्या एका अपघातात युवक गंभीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा शहर जवळ असलेल्या प्यासा हॉटेल समोर दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. दोन्ही दुचाकी स्वार भरधाव वेगाने जात असतांना अमोरासमोर येवून धडक झाल्याने अपघात घडला असल्याचे समजते.
या भीषण अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले आहे. या अपघातात दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती हे पंचगव्हाण गावातील आहेत. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या अपघातात आकाश निंबोकर वय 40 वर्ष रा. हिवरखेड (जखमी), सायमा फातिमा वय 35 वर्ष (जखमी) खेलमुकर्दम पंचगव्हाण, महिहम फतेमा 04 महिने (जखमी) खेलमुकर्दम पंचगव्हाण. अशी जखमींची नावे आहेत.
तर आसिक खान कुदरत खान वय 45 वर्ष (मृत) खेलमुकर्दम पंचगव्हाण, बुशरा असिक खान वय 06 वर्ष (मृत) खेलमुकर्दम पंचगव्हाण, हरान आसिक खान वय 05 वर्ष (मृत) खेलमुकर्दम पंचगव्हाण अशी मृतकांची नावे आहेत.
आणखी एक अपघात
दरम्यान, तेल्हारा शहरातील संत तुकाराम चौकाजवळ आणखी एक अपघात झाला. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून, बचावकार्य सुरू आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा