road-accident-chikhalgaon-akl: चिखलगाव जवळ भीषण अपघात: ट्रक आणि कारची धडक; तीन गंभीर जखमी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  वाशीम महामार्ग वर पातुर तहसील अंतर्गत येत असलेल्या चिखलगाव जवळ ट्रक क्रमांक MH 12 FC 9099 आणि कार क्रमांक MH 307626 यांच्यात जोरदार धडक होवून  आज रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. 



प्राप्त प्राथमिक माहिती नुसार, या अपघातात कार मधून प्रवास करणारे  तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना 108 रुग्ण वाहिकेने  त्वरित अकोला सर्वोपचार रुग्णालयात रवाना करण्यात आले. 




गंभीर जखमींना रुग्णालयात पोहचविण्यात  पत्रकार दूल्हे खान, 108 रुग्णवाहिकेचे चालक सचिन बारोकर, डॉ फुरकानउद्दीन यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. पुढील कार्रवाई पातुर पोलीस करीत आहेत. वृत्त लिहे पर्यन्त जखमींचे नावे प्राप्त झाली नाहीत.



टिप्पण्या