- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
risk-heat-stroke-akola-district: उष्माघाताचा धोका; जिल्ह्यात 31 मे पर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकाेला: उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात 31 मेपर्यंत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केली आहे. हा आदेश त्यांनी शनिवार, 25 मे 2024 राेजी निर्गमित केला.
प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश 25 मे 2024 राेजी प्राप्त झाला. त्यानुसार 25 ते 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सियसपर्यंत आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास हाेऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय याेजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 25 मे राेजीच्या दुपारी 4 पासून ते 31 मेपर्यंत फाैजदारी प्रक्रीयात संहिताचे कलम 144 चे आदेश करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिदंडाधिकारी श्री कुंभार यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंगमेहनत करणारे कामगार आणि औद्याेगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमाेपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची राहणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचारयत, महानगरपालिका, नगर परिषद, पाेलिस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी 10 वाजतापर्यंत व सायंकाळी 5 नंतर काेचिंग सेंटर चालवावेत. सकाळी 10 ते 5 वेळेत क्लास सुरु ठेवायचे असल्यास तेथे पंख, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबंिधत क्लासच्या संचालकांची राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
विदर्भातील आजचे तापमान
AKOLA 45.6
AMRAVATI 44.4
BHANDARA 40.6
BULDANA. 40.6
BRAHMPURI 44.0
CHANDRAPUR 43.4
GADCHIROLI 41.4
GONDIA 40.2
NAGPUR. 41.7
WARDHA 44.0
WASHIM 43.8
YAVATMAL. 45.5
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा