narnala-wildlife-sanctuary-tiger : नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये पर्यटकांना झाले पट्टेदार वाघाचे दर्शन ; पर्यटकांमध्ये आनंद

सर्व छायाचित्र सौजन्य: सतीश देशमुख आणि मिलिंद जोग 






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जिल्ह्यातील शहानूर गेट नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये (Narnala Wildlife Sanctuary) पर्यटकांना काल शनिवारी दुपारी वाघाचे दर्शन झाले आहे. वाघांचे दर्शन हे अतिशय दुर्मिळ असल्याने निसर्गप्रेमीं मध्ये आनंद पसरला आहे. 



अकोला शहरापासून 63 किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या या अभयारण्यात मोठ्या प्रमाणत वन्य प्राणी आहेत. काल पर्यटन साठी गेलेल्या सतिश देशमुख आणि मिलिंद जोग या निसर्ग प्रेमींना वाघाचे दर्शन झाले.





त्याच बरोबर हिरणाचा शिकार करताना रानटी कुत्रे सुद्धा या पर्यटकांना दिसून आले. सतीश देशमुख आणि मिलिंद जोग यांनी हे सर्व दुर्मिळ योग आपल्या कॅमेरात टिपले आहेत. हे सर्व छायाचित्र खास भारतीय अलंकार न्यूज 24 च्या वाचकांसाठी सतीश देशमुख आणि मिलिंद जोग यांनी उपलब्ध करून दिली आहेत.




दरम्यान, भारतात 1973 मध्ये घोषित झालेल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एकूण 1 लाख 30 हजार 96 चौरस किलोमीटर परिसरात व्याप्त आहे. 





यामध्ये गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नरनाळा वन्यजीव अभयारण्य, वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य चा समावेश आहे.



नरनाळा अभयारण्यात मोठ्या संख्येने वाघ असल्याचं सांगितलं जातं.  शनिवारी दुपारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नरनाळा वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये दिसून आलेल्या पट्टेदार वाघामुळे पर्यटकांची पाय आता नरनाळाकडे वळली आहेत.


सर्व छायाचित्र सौजन्य

सतीश देशमुख आणि मिलिंद जोग, अकोला 


टिप्पण्या