- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Mh-board-10th-ssc-result-2024 : राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के: यंदाही कोकण विभाग अव्वल, नागपूर विभाग सर्वात मागे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता दहावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 99.1% असून, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च कालावधीमध्ये घेतली होती.
दहावीच्या निकालात यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. विभागनिहाय निकालाची एकूण टक्केवारी मंडळामार्फत जाहीर केली आली.तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी 23 हजार 272 शाळांमधून 16 लाख 9 हजार 445 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये एकूण 8 लाख 59 हजार 478 विद्यार्थी, 7 लाख 49 हजार 911 विद्यार्थिनी आणि 56 तृतीयपंथी आहेत. राज्यातील एकूण 5 हजार 86 मुख्य केंद्रांवर ही दहावीची परीक्षा पार पडली,अशी माहिती मंडळाने दिली आहे.
विभाग निहाय निकाल टक्केवारी
पुणे : 96.44 टक्के
नागपूर : 94.73 टक्के
संभाजीनगर : 95.19 टक्के
मुंबई : 95.83 टक्के
कोल्हापूर : 97.45 टक्के
अमरावती : 95.58 टक्के
नाशिक : 95.28 टक्के
लातूर : 95.27 टक्के
कोकण : 99.01 टक्के
या संकेतस्थळावर पाहा निकाल
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा