- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : जिल्हा परिषद कृषी सभापती यांच्या दालनातील आयोजित बैठकीत कृषी विभागाच्या खरीप हंगामाच्या पेरणी पुर्व तयारीची झाडाझडती घेत, कृषी सभापती योगिता रोकडे यांनी अवैध खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून परवाना रद्द करण्याची निर्देश दिलेत.
खरीप हंगामातील खते व बियाणे पुरवठ्यासंदर्भात विविध तालुक्यातुन शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याबाबत जि. प. कृषी विभागाची बैठक बुधवारी आयोजित केली होती.
यावेळी खते व बियाणे यांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत आणि यात पुरवठा करणाऱ्या कंपन्या मनमानी कारभार करतात, यावर बोट ठेवत त्यावर कारवाई करण्याचे निर्देश देऊन शेतकऱ्यांना खते व बियाणे यांचा पुरवठा कुठे आणि कीती उपलब्ध आहे, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच खतांच्या वाटपत होणारी काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश कृषी सभापती योगिता रोकडे यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी यांना दिले.
यावेळी शेतकरी प्रतिनिधी राजेंद्र पातोडे, श्रीकांत घोगरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी जवंजाळ, अकोला तालुका कृषी अधिकारी रोहीणी मोघाड, मुर्तिजापूर तालुका कृषि अधिकारी विनोद शिंदे, अकोट व तेल्हारा तालुका कृषि अधिकारी भरत चव्हाण, पातुर तालुका कृषी अधिकारी एन. एन. जोशी, बाळापूर तालुका कृषी अधिकारी जयंत सोनोने, शेतकरी प्रतिनिधी राजकुमार दामोदर, दादाराव पवार, मोहन रोकडे, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा