- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांचे आज सकाळी 11 च्या सुमारास कार्डियाक अरेस्टने निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. त्यांच्यामागे आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
महल्ले सकाळी महाराष्ट्र दिनाच्या शासकीय समारंभासाठी शास्त्री क्रीडांगण येथे उपस्थित होते. त्यानंतर ते घरी गेले. सकाळी 11 वाजताच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने ते तपासणीसाठी ओझोन इस्पितळाकडे निघाले. रुग्णालयापर्यंत पोहोचताच ते कोसळले. त्यांना तत्काळ कक्षात घेऊन सीपीआर देण्यात आला. तथापि, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
स्व. महल्ले हे कष्टाळू, कर्तव्यदक्ष सहकारी म्हणून जिल्हा प्रशासनात परिचित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनेक महत्वाच्या मोहिम, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयकाची भूमिका त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन चोखपणे पार पाडली. शहर व जिल्ह्यात त्यांचा व्यापक जनसंपर्क होता. ते मृदुभाषी, उमद्या स्वभावाचे असल्याने प्रशासनाबरोबरच सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या अनेकांशी त्यांचा स्नेह होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा