fire-anganwadi-kirana-godown: मंगरूळपीर येथे अंगणवाडी किराणा गोडाऊनला भीषण आग




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वाशीम मधील मंगरूळपीर शहरात मंगलधाम स्थित अंगणवाडीचा मोठ्या प्रमाणात किराणा खाद्य आहार असलेल्या गोडाऊनला आज रात्री भिषण आग लागली असून, अग्निशमन दलाचे प्रमुख आनंद खिराडे, राहुल शिंगारे, प्रसिद्ध भगत सह तसेच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनची टीम आगीवर नियंत्रण आणून, आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार आगीचे कारण गोडाऊन मधे उपस्थित कामगार हे रात्रीचा स्वयंपाक करीत होते. स्वयंपाक करत असतानाच अचानक गॅस सिलेंडरची नळी फाटल्याने सिलेंडर भडकले, तेव्हा उपस्थित कामगार आरडाओरड करत मदती करीता बाहेर आले. तो पर्यंत क्षणार्धात गोडाऊन मधे आग पसरली असल्याचे गोडाऊन मधील कामगारांकडून सांगण्यात आले



पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीर टीमचे प्रमुख अतुल उमाळे,गोपाल गीरे, लखन खोडे, राजेश भारस्कर,शुभम भोपळे हे जिवरक्षक दिपक सदाफळे यांच्या फोनवरुन मार्गदर्शनात मोठ्या शिताफीने आग विझविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 



गोडाऊनमधे अंगवाणवाडीचा आहाराचा भला मोठा साठा असल्याची माहीती असुन यामध्ये एक घरगुती गॅस सिलेंडर असल्याची माहीती होती. जेसीबीद्वारे सिलेंडर आता बाहेर काढले आहेत. सिलेंडर मधुन गॅस निघणे चालु आहे. यामुळे काही घटना घडणार नाही, याची दखल घेत तसेच आजुबाजुला वस्ती घरे असल्याने इतरांना आपल्या घरातील गॅस कनेक्शन सिलेंडर बंद करून ठेवण्यासाठी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे जवान विनंती करत आहेत. 


यावेळी वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. वरचेवर संपर्क साधून आहेत. मंगरुळपीर उप विभागीय अधीकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शितल बंडगर  तसेच ठाणेदार आडे यांच्या सह पोलीस कर्मचारी मदत करत आहेत. नगरपरिषदचे सिईओ शेवदे सह न.प.चे सर्व अधिकारी कर्मचारी हजर आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधीकारी शाहू भगत हे सुद्धा संपर्कात आहेत. 



नुकताच हाती आलेल्या वृत्तानुसार आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असुन, यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर किराणा सामान जळुन खाक झाला आहे.

टिप्पण्या