electricity-supply-interrupted: वारा-वादळ नसतानाही दिवसातून पाच-सात वेळा वीज पुरवठा होतो खंडित; जुने शहर भागात नित्याची बाब





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : महानगरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून जुनेशहर भागात वारा, वादळ अशी परिस्थिती नसतांनाही, दिवसातून किमान पाचसात वेळा वीज पुरवठा खंडित होणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे नागरिक आणि व्यवसायिक हैराण झाले आहेत. वीज ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची व्यवस्था करावी, या आशयाचे निवेदन सनातन संस्कृती महासंघातर्फे महावितरण कंपनीच्या शहर विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांना देण्यात आले.


महावितरण कंपनीचे एक जुने परिपत्रक आहे. ज्यात म्हंटले आहे कि, "फ्लॅश आणि रोलेक्स", या कंपनीचे वीज मीटर सदोष आहेत. ते बदलवण्यात यावेत. ते बदलावण्यात आलेले नाहीत. अद्यापही अनेक ग्राहकांकडे दोन्ही कंपनीचे मीटर आहेत. ते बदलविण्यात यावेत.

महावितरण कंपनीकडे वीज मीटरचा साठा नसल्यामुळे, नवीन विजपूरवठा घेणाऱ्या तसेच ज्या ग्राहकांचे मीटर सदोष अथवा जळाले आहेत, त्यांना बाहेरून मीटर खरेदी करण्याचे सांगण्यात येते. यामुळे वीज ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बाहेरून वीज मीटर खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये.


पूर्वी देखभालीच्या अथवा अन्य कारणामुळे वीज पुरवठा बंद राहणार असल्यास तशी पूर्वसूचना वीज ग्राहकांच्या पंजीकृत मोबाईल वर देण्यात येत होती. आता अशी कुठलीही पूर्वसूचना ग्राहकांना देण्यात येत नाही. ही सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी.


महानगराची हद्दवाढ झाल्यामुळे नजीकच्या खेड्यातील काही वीज ग्राहक शहर विभागात समाविष्ट झाले आहेत.त्यामुळे शहर विभागातील काही तक्रार निवारण केंद्रावर कामाचा अतिरिक्त भर पडू नये म्हणून काही वीज ग्राहकांना कुठलीही पूर्वासूचना न देता, दुसऱ्या तक्रार निवारण केंद्रात वर्ग करण्यात आले आहे.त्यामुळे विजेसंबंधी काही तक्रार अथवा समस्या असल्यास ग्राहकांना आपण नेमके कुठल्या तक्रार निवारण केंद्रात येतो यासाठी खेटे घ्यावे लागतात.



सदर बाब पूर्वी कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता यांचे निदर्शनास आणून दिली होती.त्यांनी स्थानिक वृत्तपत्रातुन देण्याचे तसेच तक्रार निवारण केंद्रावर सूचना लावण्याबाबत आश्वासन दिले होते.परंतु असे झाले नाही.


वीज ग्राहकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याची व्यवस्था करावी या आशयाचे निवेदन सनातन संस्कृती महासंघातर्फे महावितरण कंपनीच्या शहर विभागाचे कार्यकारी अभियंता जयंत पैकीने यांना देण्यात आले.चर्चे दरम्यान त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. लवकरच शहर उप विभाग क्रमांक 2 पासून "जीनस", कंपनीचे प्रीपेड मीटर बसवण्याच्या कामास सुरुवात होणार असल्याची माहितीही जयंत पैकीने यांनी दिली.



यावेळी महासंघाचे अध्यक्ष ऋषिकेश जकाते, उपाध्यक्ष अमित शिरसाट, सहसचिव हेमल खिलोसिया, प्रसिद्धीप्रमुख विजय केंदरकर, जयंत इंगळे, सुबोध देशमुख,अमित अग्रवाल, निशांत इंगळे, अभिजित कराळे उपस्थित होते.

टिप्पण्या