dump-biomedical-waste-road: आता रस्त्यावर कचरा टाकणं पडणार महागात; बायोमेडीकल वेस्‍ट रस्‍त्‍यावर टाकल्‍यामुळे नाईक हॉस्‍पीटलवर 25 हजारांची दंडात्‍मक कारवाई





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीक पिशव्‍यांचा विक्री व वापर करणा-यांवर तसेच परिसरात कचरा टाकणा-यांवर यापुढे दंडात्‍मक कार्यवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी कचरा हा मनपा कचरा घंटा गाडीत टाकावा, असे आवाहन मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान आज जनता बाजार येथील भाजी व फळ विक्रेत्यांवर शासन बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नाईक हॉस्पिटल  रस्‍त्‍यावर कचरा टाकत असल्याने त्‍यांच्‍यावर 25 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली.



आज 15 मे रोजी सकाळी मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांच्‍या व्‍दारे अकोला शहरातील बाजार पेठ येथील स्‍वच्‍छतेची पाहणी दरम्‍यान जनता भाजी बाजार येथील किरकोळ भाजी व फळ विक्रेत्‍यांव्‍दारे शासनाने बंदी घतलेल्‍या प्‍लास्‍टीक पिशव्‍यांच्‍या वापर करतांना आढळून आल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडे असलेला प्‍लास्‍टीक पिशव्‍यांचा साठा जप्‍त करण्‍यात आला. सोबतच यापुढे त्‍यांना अशा पिशव्‍यांचा वापर न करणे तसेच आपला परिसर स्‍वच्‍छ ठेवणे व कचरा, मनपाच्‍या कचरा घंटा गाडी मध्‍येच टाकणे संदर्भात ताकीद देण्‍यात आली आहे.

      



याचसोबत पाहणी दरम्‍यान हुतात्‍मा स्‍मारक जवळील नाईक हॉस्‍पीटल यांनी बायो मेडीकल वेस्‍ट रस्‍त्‍यावर टाकल्‍याचे आढळून आल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर 25 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. यावेळी मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे, स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, स्‍वच्‍छता निरीक्षक सुरेश पुंड, धनराज पचेरवाल, राकेश चिरावंडे व ईतर कर्मचा-यांची उपस्थिती होती.

          

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्‍या घरात किंवा प्रतिष्‍ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेग-वेगळा गोळा करून परिसरात ईतरत्र न टाकता फक्‍त मनपाच्‍या कचरा घंटा गाडी मध्‍ये टाकून आपले परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍याचे तसेच शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लस्‍टीक पिशव्‍यांचा वापर टाळून मनपा प्रशासनास सहकार्य करण्‍याचे आवाहन उपायुक्त ठाकरे यांनी केले आहे.





दरम्यान कचरा घंटा गाड्या नियमित वेळेवर येत नाहीत. तसेच या गाड्यावर तैनात कर्मचारी नागरिकांना सहकार्य करीत नाहीत, अश्या अनेक नागरिकांच्या तक्रार आहेत. तर  मध्यंतरी मनपाने ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन वेगवेगळ्या बिन नागरिकांना देण्यात येणार असे जाहीर केले होते. या बिन अद्यापही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. याकडे मनपा उपायुक्त गांभीर्याने लक्ष देतील का, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे.







      



          

  




टिप्पण्या