crime-against-women-akola: महिलेचा विनयभंग अन् पोलीस हवालदाराचे निलंबन; ऑडियो क्लिप झाली व्हायरल, राष्ट्रीय महिला आयोगाकडे पीडिता मागणार न्याय


 file image 




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला : राज्यात महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एका घटनेनं भर पडली. पोलीस खाकी वर्दीला कलंकित करणारी ही घटना आहे. अकोल्यात पोलीस हवालदाराने एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. अकोला जिल्ह्यातल्या चान्नी पोलीस स्टेशनच्या हवालदार बाळकृष्ण येवले (ब.नं.1636) याने पोलिस स्टेशन हद्दितल्या एका गावातल्या तक्रारदार महिलेला शरीर सुखाची मागणी करून तिचा विनयभंग केला आहे, अशी तक्रार संबंधित महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात या पोलिसाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चान्नी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय चव्हाण करीत आहेत.


दरम्यान या घटनेने कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न उपस्थित होतो. इतकेच नव्हे तर पोलिस कमर्चारी येवले याने महिलेला  सतत फोन कॉल करुन मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला. 


काय आहे प्रकरण ?


तक्रारदार महिलेला आणि तिच्या पतीला गावातल्या काही लोकांनी मारहाण केली, यासंदर्भात तिने चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तर मारहाण करणार्‍या व्यक्तींनी देखील तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. दरम्यान तक्रार करून काही दिवस उलटले आणि या प्रकरणात पोलीस कर्मचारी येवले याने तक्रारदार महिलेशी संपर्क साधला. आणि सतत कॉल करून विचारणा करू लागला, मीच तुमची जमानत करून देतोय असे फोनवर तो म्हणू लागला, टेन्शन घेऊ नको, असे आश्वासने देऊ लागला. त्यानंतर 23 एप्रिल रोजी दुपारी दिड ते दोनच्या दरम्यान येवले हे तक्रार महिलेच्या घरी पोचला, आणि त्यावेळी घरात ती एकटीच होती. इथे त्यांना तिचा विनयभंग केला, आणि बळजबरी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. तक्रार महिलेनं आरडाओरड करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या पतीला एन्काऊंटर मध्ये जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली. हा प्रकार संपूर्ण पतीला सांगितला परंतु येवले हा चान्नी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याने तिथे तक्रार न करता थेट तिने पोलीस अधीक्षककांडं तक्रार केली. असेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी आज चान्नी पोलिसांनी येवलेविरुद्ध 354(A), 354(D),447, 506 नूसार गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी एका आदेशान्वये येवले याला निलंबित केले. हा आदेश 11 मे रोजी दिला आहे.


तक्रारदार महिला आणि येवलेच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप वायरल


दरम्यान आरोप असलेल्या पोलीस हवालदार येवले आणि तक्रारदार महिलेच्या संभाषणाच्या अनेक ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे, नेमकं काय आहे.


व्हायरल ऑडिओ क्लिप.. 


तक्रार दार महिला- हॅलो

पोलिस हवालदार - पोचली का?

महिला - हो पोचली.

पोलिस - अरे.. ते वाट पाहत आहे तुझी, नंबर लाव.

महिला- हा.. लावला सर, प्रोसिजर सुरू आहे. 

पोलिस - चालू आहे ना. 

महिला - चालू आहे. 

पोलिस - मी तर 2 ते 3 फोन लावले तुला. 

महिला - फोन सायलेंटवर होता.

पोलिस - काय हेंबा... आहे तू. 

महिला - सायलेंट होता.

पोलिस - तू भीत कोणाला, चोर आहेस का? तू. 

महिला - चोर नाही, फोन सायलेंट करून ठेव. 

पोलिस - तू भीत असणार तर मला सांग, मी तर नाही भीत. 

महिला- नाही ... भीत नाही सर. भ्यायचं कशाला.

पोलिस - तू माझे शब्द लक्षात ठेव, भीत का?

महिला - नाही भीत नाही.

पोलिस - ठीक आहे ते आटोपूनं ये, उद्या मी तुझ्या घरी येतो. 

महिला - बर.. 

पोलिस - जेवण काय बनवते. 

महिला - तुम्ही सांगा ते करतो. 

पोलिस - मटन, दारु, मच्छी, अंडे हे काहीच चालत नाहीये. 

महिला - साध जेवण. 

पोलिस- नाही.. उडीद दाळ आणि भाकर. 

महिला- ओके.

पोलिस - उद्या येतो मी.. 

महिला -हो.



"आज 11 मे रोजी मी व माझे पती बीट जमादार बाळू येवले यांच्या विरोधात माझ्यासोबत झालेल्या प्रकाराची सविस्तर तक्रार देण्यासाठी आली होती पोलिसांनी बाळू येवले यांना वाचविण्याचा पूर्ण पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. मी दिलेल्या फिर्यानुसार बाळू येवले यांच्यावर कलम 452 354 बी न लावता जामीन पात्र कलम लावून प्रकरण दाबण्याचा पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात मी राष्ट्रीय महिला आयोग व पोलीस महासंचालक यांच्याकडे न्याय मागणार आहे."


पीडित महिला विवरा

टिप्पण्या