banned-plastic-action-akl-mnc : बंदी असलेल्या प्‍लास्‍टीक वस्तू आढळल्‍याने व्‍यावसायिकांवर मनपा व्‍दारे दंडात्‍मक कारवाई




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मनपा आयुक्‍त तथा प्रशासक यांच्‍या आदेशान्‍वये आणि मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनात शासनाने बंदी घतलेल्‍या प्‍लास्‍टीक वस्‍तू विक्री, वापर व हाताळणी करणा-या व्‍यावसायिकांवर दंडात्‍मक कारवाई सुरू आहे.

त्‍या अनुषंगाने 22 मे रोजी मनपा उत्‍तर झोन अंतर्गत पथकाव्‍दारे टिळक रोड वरील व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांची तपासणी केली असता रमेश कुमार या व्‍यावसयिकाकडे शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीक कॅरीबॅगचा साठा आढळून आल्‍याने त्‍यांचे कडील साठा जप्‍त करून त्‍यांच्‍यावर 5 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. याचसोबत दक्षिण झोन अंतर्गत गौरक्षण रोड, इन्‍कमटॅक्‍स चौक येथील व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांची तपासणी केली असता श्रीहरि फ्रुट्स यांचे कडे शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीकच्‍या वस्‍तू आढळून आल्‍याने त्‍यांचे कडील साठा जप्‍त करून त्‍यांच्‍यावरसुध्‍दा 5 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.  



कारवाई सहायक आयुक्‍त विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे आणि स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर यांच्‍या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत स्‍वच्‍छता निरीक्षक निरीक्षक मोहम्‍मद अलीम, शेख सलीम, रोशन अली, जोगेंद्र खरारे, मोहम्‍मद आसिफ, जितेंद्र गोराने, विरू बेंडवाल, किरण खंडारे, सुनिल खेते, रूपेश मिश्रा, प्रताप राऊत, धनराज पचेरवाल आदींचा समावेश होता.


21 मे रोजी मनपा दक्षिण झोन येथील पथकाव्‍दारे गौरक्षण रोड येथील दुकानांची तपासणी दरम्‍यान वैभव होटेल यांचे कडे शासनाने बंदी घातलेल्‍या  प्‍लास्‍टीकने बनलेली चमचे, ग्‍लास आणि स्‍ट्रॉ वापरण्‍याचे आढळल्‍याने त्‍यांचे कडील सहित्‍य जप्‍त करून त्‍यांचेवर 5 हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.




      

सदर कारवाई सहायक आयुक्‍त देविदास निकाळजे आणि स्‍वच्‍छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर यांच्‍या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत स्‍वच्‍छता निरीक्षक किरण खंडारे, सुनिल खेते, रूपेश मिश्रा, प्रताप राऊत, धनराज पचेरवाल आदींचा समावेश होता.

      

याच सोबत उत्‍तर झोन सहायक आयुक्‍त विठ्ठल देवकते यांच्‍या मार्गदर्शनात पथकाव्‍दारे जैन मंदीर परिसरातील फेरीवाले भजी व फळे विक्री करणा-या किरकोळ व्‍यावसायिकांकडून शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीक कॅरीबॅगचा साठा जप्‍त करून त्‍यांना पुन्‍हा या पिशव्‍यांचा वापर न करणे संदर्भात ताकीद देण्‍यात आली तसेच किराणा बाजार येथील अशोक हिंद ट्रेडर्स या व्‍यावसायिकाकडून शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लास्‍टीक कॅरीबॅग आणि चहाचे कपाचा साठा आढळल्‍याने त्‍यांचेकडील साठा जप्‍त करून त्‍यांचेवर 5 हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.



      

सदर कारवाई सहायक आयुक्‍त विठ्ठल देवकते यांच्‍या मार्गदर्शनात करण्‍यात आली असून या कारवाईत स्‍वच्‍छता निरीक्षक मोहम्‍मद अलीम, शेख सलीम, रोशन अली, जोगेंद्र खरारे, मोहम्‍मद आसिफ, जितेंद्र गोराने, विरू बेंडवाल आदींचा समावेश होता.   


मनपाव्‍दारा पुर्व झोन अंतर्गत माता नगर येथील अतिक्रमणावर निष्‍कासनाची कारवाई



अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत असलेल्‍या  प्रभाग क्रं. 6 येथील माता नगर स्थित बेघर निवारा ईमारतीच्‍या लगतच्‍या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्‍याचे आढळून आल्‍यावर 21 मे रोजी मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये तसेच सहायक संचालक नगर रचना आशिष वानखडे आणि सहा.आयुक्‍त विजय पारतवार यांच्‍या मार्गदर्शनात सदरचे अतिक्रमणावर मनपा पुर्व झोन कार्यालय, अतिक्रमण विभागाव्‍दारे आणि पोलीस प्रशासनाच्‍या सहकार्याने  निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे.

      


या कारवाईत सहा.अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, सहा.नगर रचनाकार राजेंद्र टापरे, कनिष्‍ठ अभियंता नरेश कोपेकर यांचेसह अतिक्रमण विभागातील आणि पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता.

टिप्पण्या