- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
arun-vora-kidnapping-case : अरुण वोरा अपहरण प्रकरणी माहिती देणाऱ्यास पोलीस विभागाकडून 25 हजाराचे बक्षीस जाहीर; भाजपा पदाधिकारी यांनी दिली घटनास्थळी भेट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: दगडी पूल परिसरातून सोमवारी रात्री अपहरण झालेले व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा (रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला) यांचा अद्यापही काहीच सुगावा लागला नाही. त्यांचा शोध त्वरित लागावा यासाठी त्यांच्याबाबत माहिती देणारे व्यक्तिस अकोला पोलीसांनी 25,000 रुपयेचे ( पंचवीस हजार रूपये) बक्षीस जाहीर केले आहे. माहिती संगणाऱ्याचे नाव गोपनीय राहणार आहे.
पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला अंतर्गत येणारे चार जिन दगडी पुलाजवळील काचेच्या बॉटल विकत घेणारे व्यापारी नामे अरुणकुमार मगनलाल वोरा (रा. राधे नगर कलेक्टर ऑफीस जवळ, अकोला) हे 13 मे रोजी रात्री अंदाजे 9 ते 9.30 वाजताचे सुमारास त्यांचे चार जिन दगडी पुल जवळील गोडावुन बंद करून घरी जाण्यासाठी त्यांची मोपेड गाडी उभी करण्याचे ठिकाणी गेले असता त्यांना 2 ते 3 अनोळखी ईसमांनी जबरदस्तीने ओढत नेवुन एक जुनी पांढ-या रंगाचे कार मध्ये जबरदस्ती कोबुंन घेवुन गेले आहेत.
अरुणकुमार मगनलाल वोरा यांचे वर्णन
अरुणकुमार वोरा यांनी अंगात हिरवा आणि पांढ-या रंगाच्या पटटया असलेले टि शर्ट व क्रिम रंगाची पॅन्ट परीधान केलेली होती. त्यांची उंची- 05 फुट 08 इंच, वर्ण-गोरा व शरिरबाधा- मजबुत आहे.
गाडीचे वर्णन
एक जुनी पांढ-या रंगाची मारोती 800/अल्टो/झेन कार
अश्या वर्णनाच्या व्यक्ती बाबत जे व्यक्ती पोलीसांना माहिती देतील त्यांना पोलीस अधिक्षक अकोला यांचे मान्यतेने 25,000 रूपयाचे बक्षीस देण्यात येईल तसेच त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
येथे साधावा संपर्क
याबाबत काही माहिती मिळाल्यास
पोलीस स्टेशन रामदासपेठ संपर्क नंबर 0724-2411324
उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला मो.नं- 9130583024
पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला मो. नं 9921038111
पोलीस निरीक्षक पोस्टे रामदासपेठ मो.नं- 9702966464
सहा. पोलीस निरीक्षक पोस्टे रामदासपेठ मो. नं 9823461790
या दूरध्वनी क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. माहिती देणारे व्यक्तिचे नाव गोपनीय राहील, असे आवाहन रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मनोज बहुरे यांनी केले आहे.
भाजपा पदाधिकारी यांनी दिली भेट
सोमवारी चारजीन परिसरातुन व्यापारी अरूणभाई वोरा यांचा अपहरण झाले, त्या घटनास्थळाची पाहणी आज भाजपा पदाधिकारी यांनी केली. आमदार रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा, सिद्धार्थ शर्मा, सचीन मुदिराज, शंकर खोवाल ,अमीत मनवानी आदी यावेळी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा