भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: प्रेम संबंधातील वाद विकोपाला जावून त्यातून हत्येसारखे महापाप उच्च शिक्षित तरुणांकडून घडत असल्याचे दिसून येत आहे. अश्यातच अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असलेल्या तरुणीची दिल्लीत हत्या झाली. तिचा मारेकरी असलेला प्रियकर हा देखील डाबकी रोड भागातील रहिवासी असल्याचे कळते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सारिका आणि सूरज यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेम संबंधाला घरच्यांचा विरोध होता. हे दोघे लग्न देखील करणार होते. मात्र लग्नाला सुध्दा घरच्यांचा विरोध होता.
दरम्यान सूरजला पुण्यात एका कंपनीत नोकरी लागली. त्यानंतर त्याची बदली दिल्लीला झाली आहे. मयत सारिका एका सरकारी बँकेत काम करीत होती.
दरम्यान सारिका तिचा प्रियकर सूरजला भेटायला दिल्लीला गेली. मात्र तिथे दोघांचे काही कारणावरून वाद झाला. यात सूरजने सारिकावर हल्ला केला. ज्यामध्ये सरिकाचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तरुणीचे कुटुंबीय दिल्लीला रवाना झाले आहेत.
दरम्यान दिल्ली पोलिसांनी आरोपी सूरजला अटक केली असल्याचे समजते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा