advertisement-hoarding-akl: मनपा प्रशासन द्वारा अनाधिकृत जाहीरात होर्डींगवर कारवाई





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्‍हा,तालुका तसेच स्‍थानिक प्राधिका-यांकडून शासकीय आणि खाजगी जमीनीवर जाहीरती फलक उभारण्‍याबाबत तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात परवानगी देण्‍यात येते. तथापि परवानगी आदेशातील अटी व शर्तींचे उल्‍लंघन करून जास्‍त उंचीचे रूंदीचे फलक उभारण्‍यात आले असल्‍याचे शासनाच्‍या निर्दशनास आले आहे. नैसर्गिक आपत्‍तीमुळे (वादळ/वारा/अतिवृष्‍टी) च्‍या काळात अशी अनाधिकृत जाहीराती फलके कोसळून राज्‍यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत, अशीच दुर्दैवी घटना 13 मे रोजी घाटकोपर, मुंबई येथे घडली असून त्‍यामध्‍ये मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्‍तहानि झाली आहे. अकोला जिल्‍ह्यात या प्रकारचा घटना होऊ नये यासाठी जिल्‍हाधिकारी, अकोला यांच्‍याव्‍दारे 17 मे रोजी सकाळी ऑनलाईन प्रणालीव्‍दारे यावर उपाययोजना करण्‍यासाठी विशेष बैठक घेऊन शहरामध्‍ये मोठे फलकांची रचनात्‍मक तपासणी करणे आणि अनाधिकृत जाहीरात फलकांवर निष्‍कासनाची कारवाई करण्‍याच्‍या सुचना प्राप्‍त झाल्‍या आहे. त्‍या अनुषंगाने मनपा प्रशासनाव्‍दारे सदर अनधिकृत जाहीरात फलकांवर निष्‍कासनाची कारवाई सुरू आहे.   



त्‍या अनुषंगाने 22 मे रोजी मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्‍या  आदेशान्‍वये तसेच मनपा उपायुक्‍त गीता ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनात तोष्‍णीवाल ले-आऊट आणि मुर्तिजापुर रोड वरील एकुण 12 जाहीरात फलकांवर निष्‍कासनाची कारवाई करण्‍यात आली आहे.



      


या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहायक अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, बाजार परवाना विभागाचे गौरव श्रीवास यांचेसह अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांचा समावेश होता.


                                       

टिप्पण्या