- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
abduction-of-businessman-akl सर्वांदेखत व्यावसायिकाचे अपहरण; शहरात खळबळ, अकोल्यातील व्यापारी असुरक्षित!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रायली जीन परिसरात राहणारे व्यावसायिक अरुण वोरा यांचे सोमवारी रात्री दहा साडे दहाच्या सुमारास सर्वांसमोर अपहरण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
व्हॅनमध्ये आलेल्या काही अज्ञात आरोपींनी अपहरण केले असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.
व्यावसायिक अरुण वोरा हे रिकाम्या बाटल्यांचे मोठे व्यापारी मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाचे अपहरण करणारे आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रवास करत होते. ते जवळपास 3 तास घटनास्थळी व्यावसायिकाची वाट पाहत थांबले होते. संधी मिळताच त्यांनी व्यावसायिकाचे अपहरण केले. अपहरण झाले त्यावेळी रस्त्यानी वर्दळ होती.
शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
काही महिन्यांपूर्वी याच भागातील अलंकार मार्केट मध्ये एका रात्रीत आठ नऊ दुकानं फोडून चोरीची घटना झाली होती. तसेच काही दिवसापूर्वी एका उद्योगपतीच्या घरी चोरीची घटना घडली.तर आज व्यावसायिकाचे वर्दळीच्या रस्त्याहून अपहरण झाल्याची घटना घडली, यामुळे अकोल्यातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा