- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
sri-ram-navami-2024-akl-city: श्रीरामनवमी निम्मित अकोला शहरात भव्य शोभा यात्रा; सर्व राजकिय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : श्री रामनवमी निम्मित अकोला शहरात आज भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. यावेळी 'जय श्रीराम'च्या जयघोषानं सारा आसमंत निनादून गेला होता.
आज अकोल्यातील मोठ्या राम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अकोल्यात 39 वर्षांपासून 'सार्वजनिक रामजन्मोत्सव समितीच्या वतीने रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आज दुपारी बारा वाजता राम मंदिरात रामजन्मोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला.
यानंतर संध्याकाळी सहाच्या नंतर निघालेल्या भव्य शोभायात्रेत हजारोच्या संख्येने अकोलेकर सहभागी झाले होते. यावेळी सर्व राजकिय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते. महायुतीचे अकोला लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी सुद्धा मिरवणुकीत सहभाग घेत ढोलाच्या तालावर ठेका धरला.
आजच्या शोभायात्रेत 50 महिला दिंड्या, 10 पुरुष वारकरी सांप्रदाय दिंडी , ढोल पथक आणि 60 धार्मिक तत्वावर देखावे सहभागी झाले होते. यासह 25 फूट भव्य असा ' महापराक्रमी हनुमान ' हा चलचित्र देखावा सुद्धा उभारण्यात आला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा