sidaji-maharaj-jatra-of-patur: धर्म-अध्यात्म: 136 वर्षांची वैभवशाली परंपरा; पातूरची सिदाजी महाराज जत्रा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड

अकोला: जिल्ह्यातील पातुर गावाची अध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली आहे ती गावाचं ग्रामदैवत असलेल्या सिदाजी महाराजांनी. सिदाजी महाराजांचा जन्म अठराव्या शतकात पातूर गावातील माहोकार घराण्यात झाला. सिदाजी महाराज अवलिया संत होते. त्यांचा भक्त संप्रदायही खुप मोठा. महाराजांनी इस.वी.सन 1812 मध्ये संजीवन समाधी घेतली. तो दिवस होता गुडीपाडव्यानंतरचा दहावा दिवस.



 त्याआधी 1810 मध्ये आताच्या समाधी मंदिरासमोर असलेल्या ध्वज आणि खास परंपरा टाळाची प्रतिष्ठापना केली. अन याच दिवसापासून पातूरच्या 'ऐतिहासिक आणि वैभवशाली' सिदाजी महाराजांच्या जत्रेला सुरूवात झाली.





सकाळी महाआरतीने या यात्रेला प्रारंभ होतो. या यात्रेतील सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे दहीहंडी. गावातील मंडळी मातीच्या माठात सजवलेली दहीहंडी घेवून वाजत-गाजत सिदाजी महाराज मंदिरात दाखल होतात. या दहीहंडीत पोहे, दही, भिजवलेले हरभरे, लोणचं यांचं मिश्रण करून भरलं जातं. दुपारी ठिक बारा वाजता काल्याचं कीर्तन होवून महाआरती होते. अन या यात्रेला औपचारिक सुरूवात होते. 


यावेळी प्रत्येकजण एकमेकांना दहीहंडीचा प्रसाद देतात.  सायंकाळी सिदाजी महाराजांची पालखी गावातून काढण्यात येते. पालखी उचलण्याचा मान भोई समाजाला दिला जातो. यानंतर संपूर्ण गावा करिता भंडारा आयोजित केला जातो. यासाठी गावात मोठी तयारी केली जाते,अशी माहिती सिदाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष रामदास खोकले, विश्वस्त विठ्ठल लोथे यांनी दिली.



अनुप धोत्रे यांनी लावली हजेरी 

या यात्रेत भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आवर्जून हजेरी लावली. तर संध्याकाळी गाव भोजनासाठी तयार होत असलेल्या भाजी करिता त्यांनी यावेळी हातभार लावला.

टिप्पण्या