shrikrishna-mali-murder-case : श्रीकृष्ण माळी हत्याकांड मधील फरार आरोपींना अटक; वझेगावात शेतीच्या वादातून घडला थरार




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: वझेगाव येथील शेतशिवारात घडलेल्या हत्याकांड मधील फरार आरोपींपैकी दोन आरोपींना आज उरळ पोलीसांनी अकोला-वारी रोड रेल्वे उडडाण पुल अकोला जवळ अटक केली. घटनेपासून आरोपींनी गावातून पळ काढला होता. 






ज्ञानेश्वर श्रीकृष्ण माळी (वय ३२ वर्षे, व्यावसाय शेती रा.वजेगाव ता. बाळापुर जिल्हा अकोला) यांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारी नुसार, १६ एप्रिल २०२४ रोजीचे सकाळी ७ वाजताचे दरम्यान फिर्यादीचे वडील श्रीकृष्ण शंकर माळी हे त्यांची बैलगाडी व म्हैस घेवुन त्याचे वझेगाव शिवारातील शेतात गेले असता ते सायंकाळ पर्यंत घरी परत आले नसल्याने फिर्यादी व त्याचे मोठे वडील आनंदराव शंकर माळी यांचे सह त्यांना पाहण्यास शेतात गेले असता, त्यांना प्रसाद विलास माळी यांचे शेताचे टेकडयावर फिर्यादीचे वडील रक्ताने माखलेल्या कपडयात ६ वाजताचे दरम्यान दिसुन आले. त्यांचे बाजुलाच एक कु-हाड व विळा रक्ताने भरलेला पडलेला असल्याने यापुर्वी प्रसाद विलास माळी त्याची आई मालुबाई माळी व वडील विलास माळी यांचे सोबत वाद असल्याने त्यांनीच फिर्यादीचे वडील याचे डोक्यावर कु-हाडीने व विळयाने वार करून जिवानिशी ठार केले, असावे अशा जबानी रिपोर्ट वरून पोलीसांनी गुन्हा क्रमांक १७१/२०२४ कलम ३०२, ३४ भादंवि प्रमाणे दाखल करून तपासात  घेतला.


गुन्हा घडल्यापासुन संशयीत आरोपी  विलास शंकर माळी,( वय ५९ वर्ष) व प्रसाद विलास माळी, (वय २५ वर्ष), मालुबाई विलास माळी (तिन्ही रा. वझेगाव ता. बाळापूर) हे फरार होते. गुन्हा घडल्यापासून पोलीस स्टेशन उरळ चे अधिकारी व अंमलदार यांचे शोध पथक तयार करून आरोपींचा पोलीस स्टेशन उरळचा परीसर व, शेगाव, नांदूरा (जि बुलढाणा) येथे तसेच अकोला येथे शोध घेणे सुरू होते. 



शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी  आरोपीचे शोध दरम्यान ठाणेदार  गोपाल ढोले (पो.स्टे. उरळ जि. अकोला)  यांना गुप्त बातमीदारामार्फत गुप्त बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी विलास शंकर माळी व प्रसाद विलास माळी हे दोघे अकोला वारी रोड रेल्वे उडडाण पुल अकोला येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सपोनि गोपाल ढोले, पोउपनि सागर गोमाशे, पोहवा संतोष भोजने  , अनिल येन्नेवार, पदमसिंह असे पोलीस पथकाने अकोला शेगाव वारी रोड रेल्वे उडडाण पुल अकोला येथे सापळा रचून त्यांचा पाठलाग करून गुन्हयातिल आरोपि विलास शंकर माळी व प्रसाद विलास माळी या दोघांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणून त्यांना गुन्हयाबाबत विचारपुस केली. दोन्हीं आरोपींनी गुन्हया केल्याची कबूली दिल्याने दोघाही आरोपींना अटक करण्यात आली.


कार्यवाही बच्चन सिंग, पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे, अप्पर पोलीस अधीक्षक, गोकुळराज, उपविभागीय पोलीस अधीकारी  बाळापुर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गोपाल ढोले, ठाणेदार पो.स्टे. उरळ, पोउपनि सागर गोमाशे तसेच संतोष भोजने, अनिल येन्नेवार, पदमसिंग बैस,  अशोक पटोकार, विकास राठोड,  गणेश खुपसे यांनी केली आहे.

टिप्पण्या