lok-sabha-election-2024-akola: बोटावर मतदान केल्याची शाई दाखवा अन् मोफत हेअर कट करा; मतदान जनजागृतीचा असाही अनोखा उपक्रम





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी प्रशासन, राजकिय पक्ष, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिकरित्या अनेकांनी विविध स्तरावर मतदान जनजागृती साठी प्रयत्न केले. मात्र अकोल्यातील अनंता कौलकार या युवा केशकर्तनकारानं मतदान जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. अकोलेकरांना मतदानासाठी एका वेगळ्या पद्धतीनं प्रोत्साहीत करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.



अकोल्याच्या रामदासपेठ भागातील अनंता कौलकार यांचं  हेअर सलून आहे. आजपर्यंत अनंता यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. उद्या होणाऱ्या मतदानासाठी त्यांनी आपल्या सलून मध्ये मतदान करा लोकशाही बळकट करा असे अनेक संदेश लावले आहेत. 





अनंताचं हेअर सलून 26 तारखेच्या मतदानासाठी सज्ज झालं आहे. कारण, मतदान करणाऱ्यांसाठी अनंताची खास ऑफर अकोलेकरांना आहे. मतदान करणाऱ्यांनी बोटावर मतदान केल्याची शाई दाखवायची. अन मोफत कटींग करून जायचंय असा हा त्याचा उपक्रम. 



त्यांच्या या उपक्रमाचे ग्राहकांनीही खूप कौतूक करीत मतदानाचा हक्क बजावणार असं म्हटलं. अनंता कौलकर यांनी राबविलेला हा छोटासा उपक्रम निशचितच कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली.

टिप्पण्या