lok-sabha-election-2024-akl: ‘मोटा भाई’ अमित शाह यांच्या स्वागतासाठी अकोला सज्ज ; सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता, अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ ‘नमो संवाद’




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोल्यातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अकोल्याला येणार आहेत. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहेय ,यासाठी जय्यत तयारी भाजप तर्फे करण्यात आली. अलीकडच्या दीड महिन्यात अमित शहा यांचा हा दुसरा अकोला दौरा आहे. या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप तर्फे करण्यात आले आहे.




देशाचे यशस्वी गृहमंत्री व चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे प्रखर वक्ते उत्कृष्ट प्रशासक नामदार अमित शाह यांचं राज राजेश्वर नगरीमध्ये  23 एप्रिल रोजी आगमन होत असून, दुपारी एक वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे त्यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. 





भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रासप, कुणबी मराठा महासंघ, लहुजी सेना, रिपाई आठवले, रिपाई कवाडे गटाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री नामदार अमित शहा तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर तसेच महायुतीचे नेते यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सभा होत असून, गृह विभागाचा अहवाल असल्याचा खोटा आणणाऱ्यांना सोशल मीडियावर टीका टिपणी करणाऱ्यांना महायुतीने देशाचे व राज्याचे गृहमंत्री यांची सभा घेऊन चूक उत्तर देण्याचा कृतीने उत्तर देत आहे.





उद्या अमित शाह अकोल्यात येत असल्याने अकोल्यातील वातावरण भाजपामुळे झाले आहे. यातच 23 तारीखचे महत्व म्हणजे मंगळवार प्रभू रामचंद्राचे सेवक श्री हनुमंताची  जयंतीचे योगायोगाने येत आहे. यामुळे भाजपा प्रेमींना हा दुग्ध शर्करा योग असल्याचे वाटत आहे.





अकोला शहरात मोठ्या प्रमाणात जय्यत तयारीने दोन हजार कार्यकर्त्यांची चमु कामाला लागली असून, या सभे रेकॉर्ड ब्रेक गर्दी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रभक्तची तसेच मोदी समर्थक व महायुतीचे कार्यकर्ते जोमाना लागले आहे. आज दुपारी आमदार रणजित सावरकर, ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल, गिरीश जोशी आदींनी सभा स्थळाची पाहणी केली. तसेच उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था आणि मैदानाचे अवलोकन करुन त्यानुसार आसन आणि इतर सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. अकोल्यात अमित शाह यांच्या आगमनाने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.



टिप्पण्या