fire-safety-audit-inspection-akl: झोन निहाय फायर सेफ्टी ऑडिट तपासणी पथक कार्यान्वीत; नागरिकांनी परिसरातील कचरा जाळू नये- मनपाचे आवाहन




ठळक मुद्दे 

अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र व ईतर अग्निशामक उपाययोजना करणे गरजेचे.


उन्हाळ्याचे दिवस लक्षात शहरातील नागरिकांनी परिसरातील कचरा जाळू नये 




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालये, सर्व शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, मंगल कार्यालये, होटेल्स, लॉन, बहुमंजिला ईमारती व मोठ्या स्वरूपाची सर्व आस्थापने यांनी आपल्या आस्थापनांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस आगीपासून धोका होऊ नये याकरिता इमारतीचे, आस्थापनांचे अनुज्ञाप्ती प्राप्त अभिकरणा मार्फत फायर सेफ्टी ऑडिट करून अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये झोन निहाय फायर सेफ्टी ऑडिटची तपासणी करण्यासाठी पथक कार्यान्वीत करण्यात आला आहे.


शहरातील सर्व आस्थापनाचे मालक, भोगवटादार, संचालक यांनी त्यांच्या इमारतींचे नियमानुसार लवकरात लवकर अनुज्ञाप्ती प्राप्त अभिकरणा मार्फत फायर सेफ्टी ऑडिट करून अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, अन्यथा ज्या आस्थापना धारकांनी फायर सेफ्टी ऑडिट करून अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणार नाही, अशा आस्थापना धारकांविरोधात महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक अधिनियम 2006 महानगरपालिका व अधिनियम 1949 कलम 376 अ अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे अकोला मनपा प्रशासन द्वारे सूचित करण्यात आले आहे.




तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता परिसरामध्ये  जमा झालेल्या कच-याला जाळू नये, यामुळे त्या परिसरात आग लागण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.




नागरिकांनी आपल्या घरात व प्रतिष्ठानात निघणारा ओला व सुका कचरा, कचरा कुंडीमध्ये गोळा करून  मनपाच्या कचरा घंटा गाडी मध्येच टाकावा व आपले परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामामध्ये मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासन तर्फे करण्यात आले आहे.






टिप्पण्या