- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
festival-hanuman-temple-akola : राणीसती धाम परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिराच्या वार्षिक उत्सव निम्मित सुंदरकांड व भजन कार्यक्रम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील सुप्रसिद्ध शक्तीपीठ श्री राणीसती धाम परिसरात जागृत पंचमुखी हनुमान मंदिराच्या वर्षिक उत्सव निमित्य अकोला पंचक्रोशीतील सुंदरकांड, रामचरित्र अभ्यासक, गायक दिलीप वानखडे यांच्या मधुर वाणीत कृष्णानवमी बुधवार 3 एप्रिल 2024 रोजी सुंदरकांड, भजन कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन श्री राणीसती धाम सुंदरकांड मंडळातर्फे आयोजित करण्यात आले आहे.
श्री राणीसती धाम येथे दर शनिवारी सुंदरकांड पठण कार्यक्रम तसेच वर्षभरात 100 वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या परिसरात अध्यात्म, धर्मं, संस्क्राराचा कार्यक्रम सातत्याने होत असतो. तसेच दर एकादशीला पैदल वारी खाटू श्याम मंदिरात जात असते.
शक्तीपीठ म्हणून हा परिसर ओळखला जातो. रिझर्व्ह माता , कालिंका माता व शारदा माता व जागृत हनुमान मंदिर या परिसरात आहे. महादेव, नवग्रह, पितरांचे मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर असून पंचमुखी हनुमान वार्षिक उत्सव स्थापनेच्या निमित्याने 3 एप्रिल रोजी सकाळ पासून सायंकाळ पर्यंत स्थानिक राणी सती धाम परिसर जिल्हा परिषद रोड आणि राणी बाग पोलीस लॉन येथे शास्त्री जनक जोशी यांच्या मधुर वाणी भजन कीर्तन होणार आहे. विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सुंदरकांड मंडळाचे फुलचंद पटवारी, रमेश लोहिया, लक्ष्मीकांत पाडीया, प्रमोद झुनझुनवाला, शंकर पाटील, दीपक अग्रवाल, आनंद अग्रवाल, प्रेम चौरासिया, गणेश अग्रवाल, मिनेश केडिया, वसंतराव भास्कर व विविध भक्तांच्या माध्यामातून हा आगळा वेगळा कार्यक्रम होत असून, भाविक भक्तांनी सुंदरकांड तसेच भजन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा