dabki-rd-resident-gift-lantern: ‘पाऊस येते तासभर, लाईन जाते रातभर’ ; डाबकी रोडवासियांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला कंदील भेट!




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : ' पाऊस येते तासभर, लाईन जाते रातभर...' अशी परिस्थिती अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात निर्माण झाली आहे. अघोषित भारनियनाने डाबकी रोड येथील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहे. जुने शहरातील विज पुरवठा हा नेहमीच खंडित होत असून, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आज येथील नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला.



जुने शहर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या समस्येवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी यावेळी नागरिकांनी दिली.



जुने शहरातील विज पुरवठा हा नेहमीच खंडित होत असून, ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी मुख्य कार्यकारी अभियंता, विद्युत भवन, अकोला यांना निवेदन दिले. 



सध्याचे बदललेले वातावरणामुळे अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण होऊन वादळी हवा व पाऊस आल्यावर रात्रभर वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रात्रभर वीज खंडित होण्याचे नेमके कारण समजत नसून रात्री वीज खंडित झाल्यावर महावितरण कडून नेमलेल्या कर्मचाऱ्यांना जुने शहरातील नागरिकांनी संपर्क केला असता ते कुठलाही प्रतिसाद देत नाहीत. यामुळे सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला त्रासलेल्या नागरिकांनी  संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले.  सोबतच अश्या परिस्थितीत जुने शहर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 



महावितरण जेव्हा थकित कर वसुली करीता आले असता तेव्हा महावितरणचे कर्मचारी त्या ग्राहकावर तात्काळ कार्यवाही करून त्यांच्या घरातील विज पुरवठा खंडित करून टाकतात. त्याचप्रमाणे जेव्हा वीज पुरवठा खंडित होते, तेव्हा महावितरण याबाबतीतही योग्यते कार्यवाही का करत नाही? असा प्रश्न नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. 





आपण थोडीही हवा किंवा पाऊस आल्यावर अशी कुठली समस्या निर्माण होऊन रात्रभर वीज पुरवठा खंडित होत असेल तर याचे नेमके कारण शोधून आपण या समस्येचे निराकरण करावे, अन्यथा लोड शेडिंग जाहीर करा. किंवा यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करू व या आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार महावितरण राहणार, असा इशारा  प्रहार संघटनेचे अकोला महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांनी यावेळी दिला.


टिप्पण्या