court-bail-application-rejected: मैत्रीचा गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोट: येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश चकोर बाविस्कर यांनी अकोट शहर पोलीस स्टेशन अपराध क्र. 161/2024 मधील आरोपी शेख हादीक शेख राजीक (वय 32 वर्ष रा. नंदिपेठ अकोट ता. अकोट जि. अकोला) याने अकोट येथील एका 40 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचे प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज आज 24 एप्रिल 2024 रोजी नामंजुर केला आहे.आरोपी हा 12 एप्रिल 2024 पासुन अकोला कारागृहात बंदिस्त आहे.



या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानात अर्जाला विरोध करतांना सरकार तर्फे लेखी उत्तर व युक्तीवाद न्यायालयात सादर केला की, पोलीस स्टेशन अकोट शहर येथे 12/04/2024 रोजी अपराध क्र. 161/2024 भा.द.वि. कलम 376 (2) (न) 506 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यातील अकोट येथिल 40 वर्षीय महिला फिर्यादी / पिडित महिला हीने आरोपी शेख हादीक शेख राजीक विरुध्द फिर्याद दिली की, पिडित महिलेची आरोपी शेख हादीक शेख राजीक सोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. व याचा गैरफायदा घेऊन आरोपीने  10 मार्च 2024 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास पिडित महिला मजुरी करण्याकरीता जात असतांना हिला आरोपी शेख हादीक शेख राजीक याने गौरक्षण संस्थान अकोटच्या मागे रेहान भाई यांच्या शेतात नेऊन तिला विश्वासात घेऊन तिला लग्नाचे

आमिष दाखवुन तिचे सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.  त्यानंतर  01 एप्रिल 2024

पावेतो वारंवार जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. तु जर आपल्या संबंधाबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी शेख हादीक शेख राजीक याने पिडित  महिलेला दिली. 


सरकारी वकील अजित देशमुख यांनी तोंडी व लेखी युक्तीवाद न्यायालयात केला की, सदरचा गुन्हा हा स्त्रि अत्याचाराशी संबंधीत असुन सदर पिडित हिंदु महिलेवर अत्याचार करणारा हा मुस्लीम समाजाचा आहे. आरोपी यास जामीन मंजुर झाल्यास

परत तसे तो कृत्य करणार नाही याची काहीही शास्वती नाही. आरोपी याच्या या कृत्यामुळे आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आरोपी याला जामीन मंजुर झाल्यास आरोपीला कायद्याचा धाक राहणार नाही. फिर्यादी पिडित महिला व आरोपी एकाच गावात राहणारे आहेत त्यामुळे तो फिर्यादी महिलेवर दबाव आणु शकतो.  आरोपीने फिर्यादी महिलेला जिवाने मारण्याची धमकी देखील दिलेली आहे. 


या प्रकरणात तपास अधिकारी म्हणुन अकोट शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक योगिता ठाकरे तपास करीत आहेत. व या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करण्यात यावा, असा युक्तीवाद न्यायालयात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला.  दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर कोर्टाने जमानात अर्ज नामंजुर केला आहे.

टिप्पण्या