babasaheb-ambedkar-jayanti : खऱ्या अर्थाने लोकशाहीला आता सुरुवात झाली- ॲड. प्रकाश आंबेडकर





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त अकोल्यातील अशोक वाटिका येथे नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज सकाळ पासूनच गर्दी केली आहे . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येत असतात. याठिकाणी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन केले. 





यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी देशवासीयांना आणि विदेशात बाबासाहेबांना मानणाऱ्या नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना प्रकाश आंबेडकर यांनी काही ठिकाणी संविधान वाचवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली असल्याचं म्हणाले. व्यक्ती बरोबरच बाबासाहेब आता वैचारिक म्हणून मानले जात असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. तर खऱ्या अर्थाने लोकशाहीला आता सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले.





आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्त काहींनी संविधान वाचून प्रतिज्ञा घेत ही जंयती साजरी केली आहे. त्यामुळे या समाजव्यवस्थेत व्यक्तीबरोबरच बाबासाहेब आता वैचारिकसुद्धा मान्य व्हायला लागले आहेत. ही सर्वांत आनंदाची बाब आहे. बाबासाहेब म्हणाले होते की, ज्या दिवशी या देशात व्यक्तीपूजा संपेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाहीला सुरुवात होईल. त्या लोकशाहीला सुरुवात झाली आहे, असे मी मानतो, अशा शब्दात सर्व भारतीय नागरिकांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रकाश आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या.




टिप्पण्या