- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
a-musical-cow-story-in-akola : अकोल्यात प्रथमच संगीतमय गोकथाचे आयोजन; गोपाल मणी महाराज यांच्या वाणीत होणार कथा वाचन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: मधुवत्सल गोसेवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या गोसेवा केंद्र निर्माण व गो चाऱ्यासाठी संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने भारत विद्यालय क्रीडांगण येथे 25 ते 29 एप्रिल कालावधीत देहरादून येथील गोकथा वाचक गोपाल मणी महाराज यांच्या वाणीत गोकथा उत्सवाचे आयोजन केले आहे. या प्रकारचे पूर्ण गोकथा असणारी कथाचे प्रथमच आयोजन होत असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष ब्रीजमोहन चितलांगे यांनी दिली.
समितीच्या वतीने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत गोकथा आयोजन संदर्भात माहिती देण्यात आली.
कथेच्या निमित्ताने 25 एप्रिल रोजी गायत्री ज्ञान मंदिर वृंदावन नगर येथून भव्य कलश यात्रा निघणार आहे. 26 ते 29 एप्रिल पर्यंत कथा परिसरात नऊ कुंडीय गायत्री महायज्ञ व नित्य तुला दान करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गोकथा दरम्यान गोभक्तांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. कथास्थळी सप्त गोमाता मंदिराची प्रतिकृती देखील निर्माण करण्यात येणार आहे.
26 ते 29 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या गोकथा निम्मित नवकुंडीय गायत्री महायज्ञ सर्व संस्कार मोफत करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील अकोला महानगरात प्रथमच होत असणारा या गोकथाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे, अशी माहिती चितलांगे यांनी दिली.
यावेळी समितीचे सह कार्याध्यक्ष श्याम आपोतीकर,विजय पनपालिया, हभप तुलसीदास मसने, अमित अगरवाल, भरत मिश्रा उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा