technology-facebook-down : फेसबुक डाऊन; युजर्स होताहेत आपोआप लॉग आऊट




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: भारतासह जगभरातील फेसबुक मंगळवारी सायंकाळी आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन आहे. याबाबत अजून अधिकृत कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याचे अनेक युजर्स कडून माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झालेले आहेत.

पुन्हा पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारल्या जात आहे. परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही, हे वापरकर्त्याला माहीत आहे. फेसबुकच्या होम पेजवर गेल्यावर Facebook आपोआप वापरकर्त्याला बाहेर काढत आहे.

तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे, असा एरर मेसेज वापरकर्त्याला दिसत आहे. परत लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता क्रेडेन्शियल्स नाकारली जात आहे.


लॉगआऊट होण्याचा प्रकार इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत असल्याची माहिती आता समोर येत आहे. अनेक जण पासवर्ड बदलून लॉग इन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचे टेक्नोसेव्हींचे म्हणणे आहे. सध्या फक्त सेवा खंडीत केली असण्याची शक्यता आहे. यावर मेटा कडून अधिकृत उत्तर येण्याची युजर्स वाट पाहत आहेत.


दरम्यान एस्क (x) वर facebook instagram डाऊन यावर हजारों मिमस वायरल होत आहेत.

टिप्पण्या