swachh majhi vari mission akl: संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन’ ‘स्वच्छ माझी वारी ' अभियान




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शेगावचे संत श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त अनेक वर्षांपासून अकोल्यातील जागर फाउंडेशनच्या वतीने ' स्वच्छ माझी वारी ' अभियान राबविला जाते. गजानन महाराजांच्या प्रगटदिनी हजारो भाविक अकोला ते शेगाव हा ४० किलोमीटर अंतर पायदळ वारी करतात.अनेक भक्त या वारकऱ्यांच्या सेवेसाठी या मार्गावर प्रसादाची सोय करतात प्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर कागद , पत्रावड्या स्टॉल किंवा मार्गावर फेकल्या जातात. मात्र जागर फाउंडेशन दरवर्षी स्वच्छता जाणीव जागृती अभियान राबवते. यामुळे यंदा रस्त्यावर कचरा कमी प्रमाणात दिसून आला. तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा कचऱ्याचे प्रमाण ७०% घटले आहे. 




'जागर फाउंडेशन' च्यावतीने श्री. संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त अकोला शहरापासून ४० कि. मी. अंतरावर असलेल्या शेगाव वारी मार्गावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 'स्वच्छता वारी श्री. गजाननाच्या दारी', असा जयघोष करत राबविण्यात आलेल्या या अभियानात सुमारे १५० स्वयंसेवक सहभागी झाले होते.



टिप्पण्या