- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार न्यूज 24
नवी दिल्ली: निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर उद्या 16 मार्च रोजी जाहीर करणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. यंदा लोकसभा निवडणुका सात ते आठ टप्प्यात होवू शकतात.
निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा जाहीर करेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतील. हे लाईव्ह स्ट्रीमिंग निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले जाईल. लोकसभा निवडणूक सात ते आठ टप्प्यात होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
तत्पूर्वी, गुरुवारी नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी सकाळी दोन्ही निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचे स्वागत केले. या दोघांनीही पदभार स्वीकारल्यानंतर आज अकरा वाजताच्या सुमारास निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा