Lok Sabha elections 2024: लोकसभा निवडणुकसाठी आचारसंहिता जाहीर; महाराष्ट्रात 20 मे पर्यंत मतदान होणार

images courtesy : ECI 




भारतीय अलंकार न्यूज 24

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची कार्यक्रमाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.





देशात ९७ कोटींपेक्षा अधिक मतदार आहे. देशातील भौगोलिक परिस्थिती प्रत्येक राज्यात वेगळी आहे. तरी सुद्धा विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून, दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी असे आहेत मतदार 


1.8 कोटी नवमतदार आहेत

48 हजार तृतीयपंथी मतदार

100 वर्षांवरील मतदार 2.18 लाख

49.7 कोटी पुरुष मतदार

47.1 कोटी महिला मतदार

20 ते 29 वयोगटातील 19.74 कोटी मतदार

82 लाख प्रौढ मतदार

महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.


मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, बल आणि पैसा चा पॉवर रोखण्यासाठी आयोगाने कठोर पावलं उचलली असून संबंधित यंत्रणांना तश्या सूचना दिल्या आहेत.



निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी 'मिथ वर्सेस रियालिटी'


'मिथ वर्सेस रियालिटी' अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.


543 लोकसभा मतदारसंघ

7 टप्यात निवडणुका होणार


पहिला टप्पा- 19 एप्रिलला मतदान होईल

दुसरा टप्पा - 4 एप्रिल पासून अर्ज भरता येणार

26 एप्रिल 2024 ला मतदान होणार

तिसरा टप्पा -19 एप्रिल पासून अर्ज भरता येणार

चौथा टप्पा - 13 मे ला मतदान

पाचवा टप्पा - 20 मे ला मतदान होईल

सहावा टप्पा - 25 मे ला मतदान होणार

सातवा टप्पा - 1 जून ला मतदान होणार


टिप्पण्या