lok-sabha-election-2024-akl: भाजपची दुसरी यादी जाहीर; अकोला लोकसभा मतदार संघासाठी अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर

 



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी भाजपाचे दुसरी यादी जाहीर असून, अकोला लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.




लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावं यामध्ये आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातल्या २० उमेदवारांची नावे यादीमध्ये आहेत.



सुधीर मुनंगटीवार, मुरलीधर मोहोळ यांनाही लोकसभेचे तिकिट देण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली आहे.दरम्यान भाजपाने घराणेशाही जोपासत अकोला लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केल्याने अकोला भाजपातील आंतरिक गटात इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


धोत्रे यांच्या निवासस्थानी जल्लोष 

अकोल्यातून खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली.अत्यंत मनमिळाऊ आणि स्मितभाषी अशी अनुप धोत्रे यांची ओळख आहे. त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्यात जोरदार जल्लोष करण्यात येत आहे.अनुप धोत्रे यांच्या अकोला येथील निवासस्थानी त्यांच्या नातेवाईकांनी आणि निकटवर्तीयांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यांच्या आई सुहासिनी धोत्रे आणि पत्नी समीक्षा धोत्रे यांनी एकमेकांना पेढे भरून हा आनंद साजरा केला आहे.


भाजपची दुसरी यादी जाहीर होताच महाराष्ट्रातील 20 जागेच्या उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अकोल्याचे चार वेळा निवडून आलेले खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना अकोला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून आला.एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. अनुप धोत्रे घरी येताच आई आणि पत्नीने औक्षण केले. अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्यांच्यापुढे दिग्गज अनुभवी राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकरांचं आवाहन आहे.मात्र चार वेळा सलग संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेवर भाजपचा झेंडा कायम ठेवला आणि अकोल्याला भाजपचा गड बनवला. त्यामुळे यावेळी अनुप धोत्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.


अनुप धोत्रे दुचाकीहून आले पक्ष कार्यालयात


अकोल्यातून भाजप तर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या उमेदवारीने जिल्ह्यात जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. अकोल्यातील भाजप कार्यालय येथे अनुप धोत्रे यांच जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी अनुप धोत्रे यांनी आपले साधेपणाचे उदाहरण दिले. अनुप धोत्रे हे दुचाकीहून पक्ष कार्यालयात दाखल झाले. यावेळी महायुतीच्या सर्व पक्षांनी धोत्रे यांचं अभिनंदन केले.



महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी


हिना गावित-नंदुरबार
सुभाष भामरे-धुळे
स्मिता वाघ-जळगाव
रक्षा खडसे-रावेर
अनुप धोत्रे-अकोला
रामदास तडस-वर्धा
नितीन गडकरी-नागपूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर
प्रतापराव चिखलीकर-नांदेड
रावसाहेब दानवे-जालना
भारती पवार-दिंडोरी
कपिल पाटील-भिवंडी
पियूष गोयल-उत्तर मुंबई
मिहिर कोटेचा-मुंबई उत्तर पूर्व
मुरलीधर मोहोळ-पुणे
सुजय विखे पाटील-अहमदनगर
पंकजा मुंडे-बीड
सुधाकर श्रृंगारे-लातूर
रणजीत सिंह नाईक
संजयकाका पाटील-सांगली




टिप्पण्या