holi-celebrate-rani-sati-dham: पारंपारिकरित्या राणी सती धाम येथे होलिका उत्सव साजरा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राणी सती धाम येथे रविवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने भव्य होलिका उत्सव साजरा करण्यात आला.  या होळीमध्ये भक्त प्रल्हाद व होलिकाचा भव्य देखावा साकारण्यात आला. देखावा बघण्यासाठी शहारातील  नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. देवी होळीची पुजा अर्चना करुन भक्त प्रल्हादचा जय जयकार करण्यात आला.




राणी सती धामचे अध्यक्ष जगदीश प्रसाद बाछुका, नवीन झुंझुनवाला, प्रमोद झुंजूनवाला, लक्ष्मीकांत पाडिया, मिनेश केडिया यांनी पूजाविधीत सहभाग घेऊन होळी पेटविली. यावेळी होळीच्या धुरामध्ये भक्त प्रल्हाद व होलिकाची झाकी अवतरीत झाली. या झाकीचे अनेक महिला पुरुषांनी दर्शन घेत होळीमध्ये नैवैद्य अर्पण केला. 




पौराणिक कथा नुसार, राजा हिरण्यकष्यपूची बहिण होलीका हिच्या वधाचा दिवस होळी म्हणून साजरा केला जातो. भक्त प्रल्हादाचा वध करण्याच्या हेतूने प्रल्हादासह सरणावर बसलेली होलीकाचं अग्नीत होरपळते, अशी आख्यायिका आहे. राणीसती मंदिरात याच आख्यायिकेवर आधारित सुंदर देखावा निर्माण करून दरवर्षी होलीका दहन केले जाते. या कार्यक्रमात होलीकेचे दहन करून वाईट विचारांची होळी करण्यात आली.



यावेळी ढप चंगचा कार्यक्रम सादर करण्यात आला. राजस्थानी गीतावर पंडित गोपाल हारे ,गोपी किशन कनुजा, कृष्णा बजाज यांनी होळी गीते सादर करीत जल्लोष केला. आभार नवीन झुनझुनवाला यांनी मानले. 



उशीरा रात्रीपर्यंत या होळी पूजेसाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मागील वीस पंचवीस वर्षापासून राणी सती धाम प्रांगणात  होलिका दहन कार्यक्रम राजस्थानी समाज तर्फे करण्यात येतो. जवळपास सहा हजार नागरीक होळी पूजन आणि देखावा बघण्यासाठी दरवर्षी येतात, अशी माहिती आयोजकांनी दिली.

टिप्पण्या