- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photos
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: भारत जोडो न्याय यात्रेला उपस्थित राहण्याचे काँग्रेसचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारले असून , 17 मार्च 2024 रोजी शिवाजी पार्क दादर येथील सभेला ॲड. आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. तसेच आंबेडकर यांनी INC चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि युवा नेते राहुल गांधी यांना राजगृह येथे जेवणासाठी निमंत्रण दिलं आहे. ॲड. आंबेडकर यांनी याबाबत आपल्या X social media हॅण्डल वरुन शनिवारी रात्री ही माहिती दिली.
मला INC अध्यक्ष श्री @kharge कडून भारत जोडो न्याय यात्रेच्या समपन महासमारोहासाठी आमंत्रण मिळाले.
“मी काल निमंत्रण स्वीकारले आणि 17 मार्च रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथे या कार्यक्रमाला उपस्थित राहीन. मी श्री मल्लिकार्जुन खर्गे आणि श्री @RahulGandhi यांना 17 मार्च 2024 रोजी राजगृह येथे जेवणाचे आमंत्रण दिले आहे.”असं एडवोकेट आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर आणि राहुल गांधी यांची भेट नव्या राजकारणाची नांदी ठरणार की काय, अशी चर्चा आता जोर धरत आहे.
टिप्पण्या
जय इंडिया 🇮🇳🇮🇳🇮🇳जय काँग्रेस 2024
उत्तर द्याहटवा