theft in alankar market akola: अलंकार मार्केट मधील चोरीच्या घटनेची पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली दखल; तर व्यापाऱ्यांनी घेतली पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांची भेट

Special Report by

Adv Nilima Shingne Jagad 




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील मध्यवर्ती भागातील मोठी बाजारपेठ अलंकार मार्केट, नागपुरी जिन तसेच वाशिम नाका या परिसरात एका दिवसात नऊ ठिकाणी चोरी झाल्याच्या घटनेची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली असून, या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ते नियोजन करून असामाजिक तत्त्वावर वचक बसवावा, अशा सूचना दिल्या आहेत.



व्यापारी सुरक्षित आहेत का?


दरम्यान हाकेच्या अंतरावर एक मोठे पोलीस स्टेशन आणि उच्च अधिकारी यांचे कार्यालय तसेच पोलीस चौकी असूनही चोरट्यांची शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत चोरी करण्याची हिम्मत झाली. अलंकार मार्केट मधील झालेल्या या घटनेमुळे अकोला शहरातील व्यापारी वर्ग खरंच सुरक्षित आहे का,असा संतप्त सवाल अकोल्यातील तमाम व्यापाऱ्यांनी उपास्थित केला आहे.



आमदार सावरकर यांनी दिल्या सूचना 



अकोला शहरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून व्यापाऱ्यांमध्ये असलेले दहशतीचे वातावरण दूर करावे यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बंदोबस्त वाढवावा, अशा सूचना दिल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून मध्यभागी असलेल्या अलंकार मार्केटमध्ये चोऱ्यांचे प्रकार सर्रासपणे सुरू असून रामदास पेठ पोलीस विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार सावरकर यांनी देऊन पोलीस प्रशासन योग्य ती दखल घेऊन चोरीचा तपास करतील, असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला आहे.



अकोला शहरात वाढत्या चोऱ्या संदर्भात आज आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन  सिंग यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेवून असमाजिक तत्त्वांवर  ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले.




वर्धा येथे पक्ष संघटनेच्या कामानिमित्त गेलेले अकोला शहरात डेरे दाखल होताच आमदार रणधीर सावरकर यांनी सरळ  घरी न जाता व्यापाऱ्यांसोबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून चोरीचा तपास एलसीबीकडे देण्याचा निर्देश दिले. लवकरच चोरी करणारी टोळीचा पर्दाफाश होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी दिला असून यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत असल्याचे सांगितले.


यावेळी व्यापाऱ्यांच्या अनेक अडचणी तसेच व्यापाऱ्यांना होणारा त्रास संदर्भात आमदार सावरकर यांनी पोलीस अधीक्षक आणि महानगर पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून सर्वांच्या रोजगाराचा विचार करून ताबडतोब समस्या निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. 



व्यापाऱ्यांनी घेतली पोलीस अधीक्षक यांची भेट




दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची भेट गुरुवारी सायंकाळी आमदार सावरकर यांच्या समवेत शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली. शहरात वाढत असलेली गुंडगिरी आणि चोरीच्या घटनांना आळा घालावा. रात्रीची गस्त अधिक चोख करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. यावर पोलीस अधीक्षक यांनी व्यापारी वर्गाशी चर्चा करुन अलंकार मार्केट आणि इतर दोन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांना लवकरच जेरबंद कऱण्यात येईल,अशी ग्वाही दिली.



यावेळी आमदार रणधीर सावरकर, राजकुमार मूलचंदानी, वसंत बाछुका, 

विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा, गिरीश जोशी, जयंत मसने, जगदीश जेठानी, चंद्रकांत सिदारा, राजेश चावला, संजय नागदेव, विशाल राजपाल, नानक राजपाल, हिरालाल कूपलानी, हरीश आलीमचंदानी, कन्हैया आहुजा, विनोद मनवानी, दीप मनवाणी, मोहन नागवानी, ब्रह्मानंद वालेच्छा, मुरली जसवाणी, अविनाश जेठाणी, नितीन जेठानी, जय मुंदडा, सुनील नावंदर, पवणेश भुप्तानी, सनी अगरवाल, राजेश जैन, जयश बलशा, राजू चावला, अजय जेठाणी आदी उपस्थित होते.


मनपा आयुक्तांची घेतली भेट 


अलंकार मार्केट मधील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याकरिता शिवसेना नेते राजेश मिश्रा, भाजपा आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा यांनी भेट घेवून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यापाऱ्यानी आपल्या समस्या सांगितल्या. रविवारी अलंकार मार्केट बंद असल्याने अनेक फेरीवाले, भंगारवाले याठिकाणी दुकाने थाटून दिवसभर आपल्या जवळील वस्तूंची विक्री करतात. हे फेरीवाले, भंगारवाले यांची कुठेही अधिकृत नोंद नाही. विना परवानगी कुठेही दुकाने थाटून विक्री करतात. या लोकांना हटकले असता (यातील काही अपवाद वगळता) अंगावर धावून येतात, शिवीगाळ करतात. सुरक्षारक्षकालाही जुमानत नाहीत. मनपा प्रशासनाने या फेरीवाले व भंगार, जुन्या वस्तू विकणाऱ्या लोकांना अलंकार मार्केट व इतर मार्केट येरीयात बसण्यास रोख लावावी. अथवा त्यांना वेगळी जागा द्यावी, या मागणीसाठी अलंकार मार्केट मधील व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे स्थानिक नेते राजेश मिश्रा, रोशन भाई, विनोद मनवणी, मनोहर पंजवानी, जगदीश जेठाणी आदींनी मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली.






अशी घडली घटना 


फिर्यादी अविनाश जेठाणी यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार, अलंकार मार्केट येथे होलसेल दुकाने आहेत. रात्री 10.00 ते 10.30 वाजे पर्यंत सर्व दुकानदार आपआपले दुकाने बंद करुन निघुन जातात. रात्रीचे वेळी सर्व दुकानदारांनी मिळून एक चौकीदार नेमलेला आहे. त्याची तब्यत खराब असल्याने कामावर आला नाही. 29/02/2024 रोजी सकाळी 05.00 वाजताचे सुमारास आकाश मार्केट येथील चौकीदाराने फोनद्वारे माहीती दिली की, अलंकार मार्केट येथील दुकानांचे शटर वाकवुन चोरी झाल्याचे दिसत आहे. यानंतर सर्व दुकानदारांनी अलंकार मार्केट येथे जावुन पाहिले असता, दुकानंमधील नगदी पैसे व मोबाइल एक्सेसरीझ चौरी गेल्योच दिसले यामध्ये  न्यु शारदा इलेक्ट्रीकल्स नगदी अंदाजे गल्यातील 3000/- रु,  ट्रेक्कट्रीक्स इलेक्ट्रानिक्स  दुकानातील मोबाइल एक्सेसरीझ, स्मॉट वाँच, एअर फोन, एअर ब्लर्डस, असे एकुण अंदाजे 20000/- रु., प्रशात ट्रेर्डस  नगदी 5000/-रु. ,के.के. ट्रेडिंग कंपनी नगदी 2000/- रु., इश्वर एन्टरप्राइजेस  नगदी 12000/- रु, श्री जी मार्केटींग नगदी 2500/-, गायत्री पॉलीट्रेड नगदी 8000/- रुपये या सर्व दुकानातील गल्यातील ड्राव्हर मधील नगदी अंदाजे 32500/- रुपये व मोबाइल एक्सेसरीझ 20000/- असा एकुण 52500/- रुपयाचा माल अज्ञात आरोपीतानी चोरून नेला आहे. तसेच  जैन उद्योग  दुकानातील काहीही चोरीस गेले नाही.





अंलकार मार्केट मधील आठ दुकानाचे 29/02/2024 रोजी सकाळी अंदाजे 04.00 वाजताच्या सुमारास सर्व 08 दुकानाचे शटर वाकवून कोणी तरी अज्ञात चोरट्यानी शटर वाकवून दुकानाच्या आत प्रवेश करुन ड्रॉव्हर मधुन नगदी पैसे व मोबाइल एक्सेसरीझ असा एकुण 52500/- रुपयाचा माल चोरून नेला आहे, असे तक्रारीत म्हंटले आहे.




या तक्रारी वरुन रामदास पेठ पोलीसांनी अज्ञात चार आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 461, 380 व 34 नुसार गुन्हे दाखल करुन तपास हाती घेतला आहे. आरोपी हे 20 ते 25 वर्ष वयोगटातील असून, सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.






टिप्पण्या