rajeshwar temple akola city : ग्रामदैवत राजेश्वर मंदिराचा होणार कायापालट: सव्वा दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर; लवकरच आराखडा नुसार कामाला सुरुवात होणार!






ठळक मुद्दा 

ग्रामदैवत राजेश्वर मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: ग्रामदैवत राजेश्वर मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर यांची मागणीची दखल तत्कालीन पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन, अकोला शहराचा आराध्य दैवत राजेश्वर मंदिराच्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला गती देऊन राजेश्वर मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचा आर्किटेक यांना निर्देश दिले होते. त्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी 50 कोटी रुपये पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते. या दृष्टीने आज आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आराखडा संदर्भात कोल्हापूर येथील आर्किटेक्ट विद्याधर ढोमसे यांच्याकडून संपूर्ण आराखडा तयार करून माहिती घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा संदर्भात भक्तांची मागणी ट्रस्ट तसेच अभिप्रेत कार्यसंदर्भात चर्चा विनिमय केले.  





या संदर्भात राजेश्वर मंदिराला  तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियोजन विभाग व प्रशासन, बांधकाम विभागाला प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहे.




हा प्रस्ताव राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याकडून मंजूर करून या संदर्भात अजून निधी उपलब्ध करून जवळपास आराखडा नुसार तसेच मंदिर परिसराचा विकास व मूर्तीची झीज व दक्षता या संदर्भात सुद्धा निर्देश दिले आहे. भविष्याचा विचार करून मंदिराच्या विस्ताराला सुद्धा आजूबाजूच्या नागरिकांशी चर्चा विनिमय करून जागा उपलब्ध करून देऊन विस्तार करता येते का, या दृष्टीने व त्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी नामदार विखे पाटील यांनी निर्देश दिले आहे. जवळपास सव्वा दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर झाला असून, यासंदर्भात ताबडतोब निर्णय होऊन लवकरच आराखडा नुसार कामाला सुरुवात होणार आहे. आमदार रणधीर सावरकर शहराचे आराध्य दैवत व पंचक्रोशीतील जागृत देवस्थानाच्या विकासासाठी कटिबद्ध असून, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील पाच तीर्थस्थळांना त्यांनी विकास निधी आणून विकास केला आहे. त्याच धर्तीवर अकोला शहरातील आराध्य दैवत प्रभू राजराजेश्वर मंदिराचा विकास करण्याचा त्यांचा संकल्प असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. 






संस्कृती, भक्ती श्रद्धा आस्था चे प्रतीक राज राजेश्वर मंदिराचा विकास होऊन शहरातील व जिल्ह्यातील सुद्धा विकास करण्याचा संकल्प भाजपा लोकप्रतिनिधी केला आहे.



यावेळी राज राजेश्वर मंदिरात वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने अभिषेक करण्यात आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ४०० पार लोकसभा विजयी करण्याचा प्रार्थना करण्यात आली. अकोला लोकसभेमध्ये सातव्यांदा भाजपाच्या झेंडा फडकू दे, अशी विशेष प्रार्थना करण्यात आली.





सुविधांसाठी आवश्यक निधी देणार


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील



अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांसाठी विविध सुविधा व आवश्यक विकासासाठी निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.


पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी आज श्री राजराजेश्वराचे मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले व मंदिरातील नियोजित विकास कामांबाबत व्यवस्थापन समितीसोबत चर्चा केली. 






मंदिरात विविध सुविधा व नियोजित विकासकामांबाबत पालकमंत्री, तसेच व्यवस्थापन समितीसमोर चर्चा करण्यात आली. त्यासंबंधी कोल्हापूर येथील तज्ज्ञ विद्याधर ढोमसे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.


मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या सूचनांनुसार आराखड्यात बदल करण्यात येतील. मंदिरांत भक्तांसाठी आवश्यक सर्व सुविधा असाव्यात. डायनिंग हॉल, कल्चरल हॉल, किचन, स्वच्छतागृह, वाहनतळ, फायर प्रोटेक्शन, लिफ्ट, घाटाचे सौंदर्गीकरण आदी सर्व कामांचा समावेश असावा. उपलब्ध जागा लक्षात घेता बहुमजली सुविधा इमारत असावी. मंदिराच्या विस्ताराबाबत आजूबाजूच्या नागरिकांशी चर्चा, विचारविनिमय करून जागा उपलब्ध होते किंवा कसे, याचा प्रयत्नकरावा. श्री राजराजेश्वर हे अकोल्याचे ग्रामदैवत असून, सुविधा, विस्तार आणि विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.


आराखड्यानुसार, मंदिरात भाविकाला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडेल, अशी रचना प्रस्तावित आहे. कावड पालखीचे महत्व लक्षात घेता भोवती मोकळी जागा उपलब्ध असेल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आदी पंचमहाभूतांचे व पर्यावरणाचे महत्व सांगणारा जलस्तंभ, नाग आदी विशाल प्रतिकृती आदी अनेक बाबी आराखड्यात प्रस्तावित आहेत, असे श्री. ढोमसे यांनी सादरीकरणात सांगितले. याबाबत मंदिर व्यवस्थापनासह सविस्तर चर्चा करून आराखडा निश्चित केला जाणार आहे.




आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि प. सीईओ बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, मंदिर व्यवस्थापन समितीचे ॲड. आर. एस. ठाकरे, ॲड. राम पाटील भौरदकर, नरेश लोहिया, गजानन घोंगे, सुधीर अभ्यंकर ,भाजपा पश्चिम विधानसभा प्रमुख विजय अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, जयंत मसने, माधव मानकर, गिरीश जोशी, तसेच बांधकाम अभियंता योगेश पाटील, किरण देशपांडे यांच्यासह या भागातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. 





टिप्पण्या