police-arrest-accuse-haryana : वृध्द दाम्पत्याची बस मधुन लाखोची बॅग लंपास; अकोला पोलीसांनी आरोपीस हरियाणातून केली अटक





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: बस प्रवासात वृद्ध दांपत्याची मदत करण्याच्या बहाण्याने दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या आरोपीस अकोला पोलीसांनी हरियाणातून अटक केली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिली.



आज बुधवार २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निमंत्रित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 



पो.स्टे. सिव्हील लाईन मध्ये दाखल बस मधुन लाखोची बॅग चोरी प्रकरणातील आरोपी हरियाणा राज्यातुन १०० टक्के मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन अटक करण्यात आल्याबाबत बच्चन सिंह यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.



१० फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी सतीष बाबुराव गंगाळे (वय ६० वर्ष रा. उमरी) हे त्यांचे पत्नीसह बसने औरंगाबाद जात असतांना वाशिम बायपास दरम्यान त्यांचेकडील लाखो रूपयांचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम २ लाख ८० हजार रूपये चोरी झाले वरून पो.स्टे. सिव्हिल लाईन येथे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचे तपासात स्था.गु.शा. अकोला येथील पथक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी आरोपीचा शोध घेणेसाठी हरियाणा रोहतक येथे रवाना झाले.


संशयीत आरोपी हे रोहतक (हिस्सार) या भागातील हरियाणा राज्यातील असल्याचे समजले होते. परंतु या भागात किसान आंदोलन चालु असल्याने रस्ते व मोबाईल नेटवर्क पुर्ण पणे बंद असल्याने तपास पथकाला अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे स्थानिक पोलीसांची मदत मिळण्यास अडचण झाल्याने तपास पथकाला तपास करणे आव्हानात्मक ठरले होते.


गोपनिय माहिती व खबरीचे नेटवर्क वरून पथकाला ०८ दिवसाच्या अथक परिश्रमा नंतर संशयीत आरोपी अमीत पिता बिजेंद्र याला ताब्यात घेवुन या गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल एक सोन्याचा नेकलेस, ०४ सोन्याच्या अंगठया, सोन्याचे चैन, सोन्याची लगडी, कानातले जोड, राणी हार व इतर सोन्याचे दागीने व  काळया मन्याची पोत सोन्याचे पेडॉल सह असे एकुण २७५ ग्रॅम सोन्याचे दागीने व नगदी १.५० लाख रूपये असा एकुण १८ लाख रूपयांचा मुद्देमाल रोहतक राज्य हरियाणा येथुन जप्त करण्यात आला. 




लक्झरी बस स्टॅण्ड, बस स्थानक येथे वयस्कर लोकांवर पाळत ठेवुन त्यांचे सुटकेस, बॅग उचलण्यास मदतीचा बहाणा करून सुटकेस, बॅग मधील रोख रक्कम, सोन्याचे दागीने चोरी करणे आरोपींच्या सवईचे आहे.


या गुन्हयात आरोपीची ओळख पटविण्यासाठी बस चालक, वाहक, ऑटो चालक लक्झरी बस चालक इत्यादि लोकांची विचारपूस करून संशयीत आरोपीची माहिती तांत्रीक पध्दतीने जमा करून पाठपुरावा करण्यात आला.


१० फेब्रुवारी २०२४ रोजी फिर्यादी सतिष बापुराव गंगाळे (वय ६० वर्ष रा. गणेश नगर, उमरी, अकोला) हे पत्नी सह नातेवाईकाच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी बसने औरंगाबाद येथे जात असतांना, बस स्टॅण्ड वरून दोघे जण बसमध्ये आपल्या सोबत असलेल्या बॅग व सुटकेस घेवुन बसच्या कॅरीवर ठेवण्यासाठी उठले असता, त्यांचे पाठीमागे बसलेला अज्ञात मुलगा फिर्यादीस म्हणला की, थांबा काका मी बॅग ठेवुन देतो. दोन्ही थैल्या व सुटकेस त्या मुलाने ठेवल्या. मात्र त्यानंतर हा अज्ञात मुलगा हिंदी भाषीक असल्याने त्याने म्हटले की, यह बस बासम जाती नहीं क्या ? हम को बासम जाना है ? असे घाई गडबड करून बस वाहक यास विचारून वाशिम बायपास अकोला येथे उतरला. त्यानंतर फिर्यादी याने सुटकेसची पाहणी केली असता, सुटकेस उघडी केलेली दिसली. त्यामध्ये फिर्यादी यांच्या पत्नीचे सोन्याचे दागीने व नगदी २,८०,००० रुपये चोरून नेले असे फिर्यादी यांचे लक्षात आल्याने त्यांनी पो.स्टे. सिव्हील लाईन येथे रिपोर्ट दिल्याने, पो.स्टे. ला अप. क्र. ११६/२०२४ कलम ३७९ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.


या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून, स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रभारी अधिकारी पो. नि. शंकर शेळके यांना स्था.गु.शा. अकोला येथील पथक तयार करून हा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. यानुसार पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांनी स्थानीक गुन्हे शाखा येथील पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.हे.कॉ. खुशाल नेमाडे, ना.पो.कॉ. वसिमोद्दीन, पो.कॉ. मोहम्मद आमीर सदरचा गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून आदेश दिले. पथकातील अंमलदार यांनी गुन्हयाचा तांत्रीक व गोपानिय माहीतीचे आधारे अथक परिश्रम करून आरोपींची ओळख पटविण्यात यशस्वी झाले.  


गुन्हयामध्ये हरियाणा येथील रोहतक येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने स्था.गु. शा. अकोला येथील एक पथक हरियाणा येथे रवाना झाले होते. तेथे ०८ दिवस अथक परिश्रम करून तसेच सदरचा भाग दिल्ली हरियाणा पंजाब सिमावर्ती भाग असल्याने तेथे सुरू असलेल्या किसान आंदोलनामुळे तेथील रस्ते व मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले होते. अश्या परिस्थितीत तेथील स्थानिक खबरी व गोपनीय माहितीदार यांच्या मदतीने यातील आरोपी अमीत पिता बिजेंद्र (वय ३४ वर्ष, रा. रूरकी, ता. जि. रोहतक, राज्य हरियाणा) यास ताब्यात घेवुन त्याचे जवळुन फिर्यादीत नमुद असल्याप्रमाणे एक सोन्याचा नेकलेस, ०४ सोन्याच्या अंगठया, सोन्याचे चैन, सोन्याची लगडी, कानातले जोड, राणी हार व इतर सोन्याचे दागीने व काळया मन्याची पोत सोन्याचे पेंडंट सह असे एकुण २७५ ग्रॅम सोन्याचे दागीने अंदाजे किमंत १६ लाख ५० हजार रूपये व नगदी १.५० लाख रूपये असा एकुण १८ लाख रूपयांचा मुद्देमाल हा रोहतक हरियाणा येथे जप्त करण्यात आले. आरोपी यास पुढील कायदेशीर कारवाई कामी  सिव्हील लाईन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे. या गुन्हयात इतर आरोपींचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे बच्चन सिंह यांनी सांगितले.


यांनी केली कारवाई 

पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला सह.पो. नि. कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, स्थानिक गुन्हे शाखा येथील अंमलदार पो.हे.कॉ. खुशाल नेमाडे, ना.पो.कॉ. वसिमोद्दीन, पो. कॉ. मोहम्मद आमीर यांनी मुख्य कामगिरी केली.  तर प्राथमिक तपासात अंमलदार  दशरथ बोरकर, गणेश पांडे, फिरोज खान, उमेश पराये, भास्कर धोत्रे, प्रमोद डोईफोडे, सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, गोकुळ चव्हान, अब्दुल माजीद, विशाल मोरे, महेद्रं मलिये, अविनाश पाचपोर, स्वप्नील खेडकर, मो. एजाज, लिलाधर खंडारे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखडे, सतिश पवार, अमोल दिपके, राहुल गायकवाड, चालक प्रशांत कमलाकर तसेच सायबर सेलचे अंमलदार आशिष आमले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.


टिप्पण्या