objection-draft-gazette-unfair: ओबीसींचा अकोल्यात एल्गार; ओबीसींवर अन्याय करणाऱ्या राजपत्राच्या मसुद्यावर हरकत





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला : मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णया विरोधात उद्या आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकमुखाने आवाज उठवायचा आहे. या निर्णया विरोधातील आपला रास्त संताप संविधानिक मार्गाने दाखवून द्यायचा आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या ट्विट नंतर ओबीसी समाजाने आपली निदर्शने सुरू केली आहे.




ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. अशातच राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन देण्यात येत आहे. राज्य सरकारचा बेकायदेशीर व अन्यायकारक निर्णय असल्याचा आरोप करीत अकोल्यात ओबीसी बांधवांनी याविरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करत ओबीसी आरक्षण बचाव संदर्भातील मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले.






जिल्हाधिकारीसह लोकप्रतिनिधींना निवेदन


 

राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात "सगेसोयरे" या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा २६ जानेवारी २०२४ च्या राजपत्राचा मसुदा हा मूळ ओबीसीत असणाऱ्या ओबीसी, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील समाज समूहाच्या अधिकारांवर घाला घालणारा आहे. शिंदे समिती ही घटनात्मक नसून ती घटनाबाह्य आहे. ती समिती बरखास्त करण्यात यावी,  या मागणीसाठी ओबीसी बांधवांनी १ फेब्रुवारी २४  रोजी  जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन दिले व रोष व्यक्त केला. तर स्थानिक आमदार  रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल यांना  निवेदन देण्यात आले. 



दरम्यान जिल्हाधिकारी सह लोकप्रतिनिधींनी ओबीसी समाजाच्या  समस्या समजून घेतल्या. या ओबीसी आरक्षण बचाव व शासनाने काढलेल्या अध्यादेश रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन दिले. 






याप्रसंगी  माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, डॉ संतोष हुसे, प्रा सदाशिव शेळके, गजानन म्हैसने, प्रकाश दाते, विजय कौसल, रामदास खंडारे, बाळकृष्ण काळबांडे, प्रा विजय उजवने, सुनील उंबरकर, प्रा श्रीराम पालकर, मनिष हिवराळे,  उमेश मसने, माया ईरतकर, वनिता राऊत, प्रा अशोक भराड, अनिल शिंदे, लखुआप्पा लंगोटे, शंकरराव बिरकड, चक्रधर राऊत, आकाश कवडे ज्योती निखाडे, सुभाष दातकर, जयदेव गावंडे,  कल्पना गवारगुरु, माधुरी गिरी,  श्रीमती नंदरधने, दीपमाला खाडे, लक्ष्मण निखाडे , दयाराम बावने, दिलीप अत्तुरकर, माणिकराव शेळके, ओबीसी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या