- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
lok-sabha-election-2024-akl: लोकसभा निवडणूक: महाविकास आघाडीने आधी त्यांचा मसुदा जाहीर करावा- ॲड. प्रकाश आंबेडकर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
जागा वाटपाबाबत वंचित करणार घटक पक्षांशी बोलणी
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मसुदा तयार झाला असला तरी कोणता पक्ष, कोणत्या व किती जागा लढणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांचा जागा वाटपाचा मसुदा जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. जागा वाटपानंतर संबंधित घटक पक्षांसोबत वंचितसाठी जागा सोडण्याबाबत बोलणी करता येईल असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता लक्षात घेता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा निकाली निघणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्याने नुकताच पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उबाठा सेना यांच्यात जागा वाटपाचा समझौता झाल्याची माहिती दिली. परंतु कोणत्या घटक पक्षाला लोकसभेच्या किती आणि कोणत्या जागा देण्यात आल्या याबाबतची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवली. महाविकास आघाडीचे निमंत्रक म्हणून घटक पक्षांशी जागा वाटपाबाबत चर्चा करता यावी म्हणून महाविकास आघाडीने आधी त्यांच्या जागा वाटपाचा मसुदा जाहीर करावा असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान त्यांनी जागा वाटपाचा मसुदा जाहीर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. ही मुदत आम्हाला सोयीचे ठरावे म्हणून आहे, बंधन नाही असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मीडिया प्रमुख ॲड. नरेंद्र बेलसरे, विकास सदांशिव, पराग गवई आदींची उपस्थिती होती.
अद्याप जागांची मागणी नाही
महाविकास आघाडीत आमचा डायरेक्ट समावेश नाही. आम्ही महाविकास आघाडीचे निमंत्रक आहोत. त्यामुळे आधी त्यांच्या जागा वाटपाचा मसुदा जाहीर झाल्यानंतर आम्ही संबंधित घटक पक्षांशी वंचितला जागा सोडण्यासंबंधी बोलणी करु. वंचित आघाडी किती जागा लढेल याबाबत अध्याप कोणताही निर्णय झालेला नाही. किंबहुना आम्ही जागांची मागणी सुद्धा केली नाही. असेही एड. आंबेडकर म्हणाले. दरम्यान त्यांनी कुठल्या प्रश्नावर आपण एकत्र येत आहोत याची घटक पक्षांनी जाणीव ठेवावी, जेणेकरून तडजोड करण्यास मुभा राहील, असेही ते म्हणाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा