- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
justice-rights-farmers-dapura: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संघर्ष यात्रा दापुरा येथून प्रारंभ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: खारपाणट्ट्यातील पाण्याच्या प्रश्नासाठी अकोला ते नागपूर पदयात्रे नंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी आता शेतकरी संघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेचा शुभारंभ आज मूर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या दापुरा येथून करण्यात आली.
अकोला जिल्ह्यात शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या न्याय हक्का साठी शेतकरी संघर्ष यात्रा प्रारंभ झाली. यामध्ये शिवसेना (उबाठा) पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाह शेतकरी आणि शेतमजूर मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
सोयाबीनला 10 हजार आणि कापसाला 15 हजार भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. आमदार देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी या पदयात्रेत सामिल झाले आहेत. जिल्ह्यातील 300 गावांतून 500 किलोमीटरचं अंतर ही पदयात्रा कापणार आहे. अकोला नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप 2 मार्च रोजी होणार आहे. अकोला जिल्ह्यातील भाजपचा गड असलेल्या अकोट, मूर्तिजापुर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदार संघातून ही पदयात्रा जाणार असून या माध्यमातून आमदार देशमुख शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहेत. यावेळी नितीन देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता अनेक प्रश्न उपस्थतीत केले आहेत.
काय आहेत प्रमुख मागण्या
१) सोयाबीनला प्रति क्विंटल ३०००/- रूपये व एकरी ५ क्विं. प्रमाणे शासनाने अनुदान दयावे.
२) कपाशीला प्रति क्विंटल ३०००/- रूपये व एकरी ७ क्विं. प्रमाणे शासनाने अनुदान दयावे.
३) कपाशी व तुरीची आयात थांबवण्यात यावी,
४) अतिवृष्टीची मदत तात्काळ शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी,
५) पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकर्याच्या खात्यात जमा करावी,
६) नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्यांनां ५००००/- रूपये प्रोत्साहनपर अनुदान शेतकर्यांना तात्काळ देण्यात यावे,
७) २ लाख रूपये वरील कर्ज माफी पासुन वंचीत शेतकर्यानां तात्काळ कर्ज माफी दयावी,
८) शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर च्या डिझेल ला सबसिडी देण्यात यावी,
९) शेतकर्याचा शेती कामावरील शेतमजुरांना नरेगा (NREGA) मार्फत मजुरी देण्यात यावी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा