jijau-auditorium-renovate-akl : जिजाऊ सभागृहाचे दुरावस्था विरोधात ‘वंचित’चे आंदोलनामुळे सभागृहाचे दीड कोटीं निधीतून नूतनीकरण




ठळक मुद्दा 

जिल्हा परिषदेकडे व्यवस्थापन दिल्यास जिल्हा परिषद फंडातून जिजाऊ सृष्टी उभारणार



 


भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला दि.१६: शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने जिजाऊ सभागृहाचे परिसरात सफाई अभियान प्रा. अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले होते. तसेच शहरातील २१ प्रमुख चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येवून निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने अकोला येथे माँ जिजाऊ हॉलची हॅम ट्रेनिंग सेंटर करीता बळकटीकरण व नुतनीकरण करणे साठी दिड कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. सबब माँ जिजाऊ साहेबांचे नावावर असलेल्या सभागृहाची दुरावस्था संपली आहे, १९ फेब्रुवारी रोजी ॲड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या हस्ते  नूतनीकरण कामाचे उद्घाटन वंचित करणार असून जिल्हा परिषदेकडे सभागृहाचे व्यवस्थापन दिल्यास जिल्हा परिषद फंडातून जिजाऊ सृष्टी उभारणार, अशी माहिती वंचित बहुजन आघाडी आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिली.


शुक्रवारी मां जिजाऊ सभागृह प्रांगणात आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र पातोडे बोलत होते.


जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला 




अकोल्यातील रेल्वे स्टेशन रोडवरील माँ जिजाऊ साहेबांची दुरवस्था पाहता वंचितने राजमाता जिजाऊ माँ साहेब आंदोलन केले होते. जिजाऊ सभागृह सफाई अभियानात प्रा. अंजली आंबेडकर तसेच युवा नेते सुजात आंबेडकर यांनी स्वत: परिसराची सफाई करीत सहभाग नोंदविला होता. त्याच वेळी शहरातील इन्कम टॅक्स, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिंधी कॅम्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, डाबकी रोड, गांधी चौक, टॉवर चौक, सिविल लाईन्स चौक, मोठी उमरी चौक, अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन चौक, हनुमान चौक, जठारपेठ चौक, शिवाजी पार्क चौक, जवाहर नगर चौक, शिवनी चौक, रतनलाल प्लॉट चौक, महाकाली/ नेहरू पार्क, शिवर चौक याठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले होते. 


दरम्यान जिजाऊ जयंती साजरी करताना १९ फेब्रुवारी शिवजयंती पर्यंत जिजाऊ सभागृहाचे नूतनीकरण न झाल्यास शहरात रथ यात्रा काढून जनतेकडून पाच-पाच रुपये गोळा करून सभागृहाचे काम पूर्ण करण्याचा इशारा प्रा. अंजली आंबेडकर यांनी दिला होता.


कार्यकारी अभियंता दिशाभूल करीत संतप्त पदाधिकारी कार्यकर्ते ह्यांनी आरडीसी यांच्या दालनात ठिय्या मांडला. प्रचंड घोषणा देण्यात आल्या आणि कार्यकारी अभियंता व विभागीय अभियंता यांच्याकडे लोकवर्गणी मागणी केली होती. अधिकारी दाद देत नसल्याने त्यांचे अंगावरून ५ - ५ रुपये ओवाळून सभागृहाचा निधी गोळा करायला सुरुवात झाली, आणि स्वक्षरीचे गठ्ठे त्यांना सोपविण्यात आले होते.


वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी १९ फेब्रुवारी पर्यंत काम करण्याचे दिलेल्या अल्टिमेटम मुळे आज सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला यांनी ई-निविदा सूचना प्रकाशित केली असून, माँ जिजाऊ हॉलची हॅम ट्रेनिंग सेंटर करीता बळकटीकरण व नुतनीकरण करणे कामासाठी दिड कोटीच्या  कामाची निविदा काढण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी रोजी ॲड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्या हस्ते नूतनीकरण कामाचे उद्घाटन वंचित करणार असून, जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि जिजाऊ माँ साहेब यांचे पाईक मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



जिजाऊ सभागृह जिल्हा परिषदेकडे व्यवस्थापन दिल्यास जिल्हा परिषद फंडातून जिजाऊ सृष्टी उभारणार तसेच जिजाऊ माँ साहेब ह्याचा भव्य पुतळा आणि सभागृहात जिजाऊ चारित्र्य वर मोठ्या प्रमाणात देखावे असलेली जिजाऊ सृष्टी उभारणान्याचे नियोजन आहे,असे यावेळी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.




पत्रकार परिषदेला राजेंद्र पातोडे यांच्यासह महिला प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, महिला महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, महानगर पश्चिम महासचिव गजानन गवई, सचिन शिराळे आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या