illegal-moneylenders-raid-akl: अवैध सावकारीवर प्रशासनाने आवळला फास; बारा पथकासह पहाटेच धाडसत्राला सुरुवात





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अवैध सावकारीवर जिल्हा प्रशासनाने फास आवळला असून, आज बुधवार 7 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नेतृत्वात व पोलीस विभागाच्या सहकार्याने अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात धाडसत्र राबवून कारवाई करण्यात आली. हे धाड सत्र पहाटे पाच वाजता पासून सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.




सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार  शहरातील गौरक्षण रोड, सिंधी कॅम्प व जयहिंद चौकातील अवैध सावकारी प्रतिष्ठान व ठिकाणांवर पहाटे कारवाईला सुरूवात करण्यात आली.  या कारवाईमुळे अवैध सावकारांची  धावपळ झाली. शहरासह इतर बारा ठिकाणी एकाच वेळी संयुक्त कारवाईला सुरुवात करण्यात आली, हे विशेष. 






या धाड सत्रात किती अवैध सावकार विरुद्ध कारवाई करण्यात आली, या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, लवकरच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातर्फ याबाबत माहिती देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आजच्या या धाडसत्रामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत, एवढे मात्र निश्चित.

टिप्पण्या