guardian-minister-visit-to-akola : शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाचे बळ; विदर्भात दुग्ध व्यवसाय विकासासाठी विविध निर्णय - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अकोट एसडीओ व तहसील कार्यालयाचे लोकार्पण


 


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा अकोला दौरा 



भारतीय अलंकार न्यूज 24


अकोला, दि. १० : विदर्भातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासारख्या पूरक व्यवसायाचे बळ देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्यांना गायींचे वाटप, बंद चिलिंग प्लँटचे पुनरुज्जीवन व या व्यवसायाला पूरक खाद्याच्या प्लँटची निर्मिती असा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अकोट येथे केले.


एकूण 11.25 कोटी निधीतून अकोट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, सुमारे ४.११ रू. निधीतून श्री संत नरसिंग महाराज पर्यटन विकास निधीतील कामांचे, तसेच ५० कोटी निधीतून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन  महसूल मंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार सुनील पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी यावेळी उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, विदर्भात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गरजू शेतकऱ्याला १० गाईंचे वाटप, सायलेज, चारा व्यवस्थापन, पशुखाद्यनिर्मिती प्रकल्प आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या माध्यमातून बंद असलेले शीतकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. 



ते पुढे म्हणाले की, आमदार श्री. भारसाकळे यांच्या प्रयत्नांतून विविध विकासकामे निर्माण झाली आहेत. तहसील व प्रांताधिकारी कार्यालयाचा जनजीवनाशी नित्याचा संबंध आहे. आता   भूमी अभिलेख आदी कार्यालयेही प्रांत कार्यालयाच्या इमारतीत एकाच छताखाली आणण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे या विकासकामांसाठी मोठा निधी मिळाला. अनेक कामांना जालना मिळाली असून ती लवकरच पूर्ण होऊन नागरिकांच्या सुविधांमध्ये भर पडणार आहे, असे श्री. भारसाकळे यांनी सांगितले.


एसडीओ व तहसील कार्यालय सोमवारपासून नव्या इमारतीत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे श्री. लोणारकर यांनी सांगितले. 







अकोला आगमन

तत्पूर्वी, आज सकाळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोला विमानतळावर आगमन झाले.


आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी त्यांचे स्वागत केले.




अकोला जिल्हा मराठा मंडळाची शतकाची वाटचाल गौरवास्पद




महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


अकोला जिल्हा मराठा मंडळाची शंभर वर्षांची वाटचाल गौरवास्पद असून, यापुढेही युवक, महिला, शेतकरी अशा विविध घटकांच्या विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.


अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या शताब्दी व स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, माजी आमदार वसंतराव खोटरे, गजानन दाळू गुरुजी, डॉ. संतोषकुमार कोरपे, मंडळाचे अध्यक्ष रणजीत सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शिरीष धोत्रे, शिवाजीराव देशमुख, महादेवराव भुईभार, डॉ. विठ्ठल वाघ, सुनील धाबेकर, रमेश हिंगणकर आदी उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत असून. अनेक उत्तम उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. आधीच्या पिढीतील व्यक्तींची दूरदृष्टी, समर्पण व योगदानातून ही संस्था घडली. परिश्रम व त्यागातूनच अशा संस्था घडतात. या कार्याचा विस्तार व्हावा व यापुढेही संस्थेने असेच भरीव योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


आमदार श्री. सावरकर, माजी राज्यमंत्री श्री. गावंडे, श्री. कोरपे यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष श्री. सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा यावेळी गौरव करण्यात आला.


पालकमंत्र्यांच्या हस्ते अकोट येथे  उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन




राष्ट्रीय आरोग्य अभियानात अकोट येथे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज झाले.


परिसरातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा या रुग्णालयाद्वारे प्राप्त होतील. रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. विखे पाटील यांनी सांगितले.



आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी यावेळी उपस्थित होते.



टिप्पण्या