bodybuilding-competition-akl: विदर्भस्तरीय भव्य खुली शरीर सौष्ठव स्पर्धा शनिवारी अकोल्यात; ‘आंबेडकर श्री 2024’ स्पर्धेत विदर्भातील नामवंत बॉडीबिल्डर करतील प्रदर्शन





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  आजच्या युगात तरुण व्यसनाकडे वळताना दिसत आहे. गुटखा, दारू, सिगरेट यासारख्या व्यसनामुळे तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अशा युवकांना म्हणून साहसी खेळाकडे वळविण्यासाठी, त्यांच्यात खेळाप्रती आकर्षण निर्माण व्हावे व तरुणांना सुदृढ व निरोगी आरोग्य लाभावे, या उद्देशाने ‘आंबेडकर श्री 2024’ या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन गेल्या नऊ वर्षापासून करत आहोत. यावर्षी देखील प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘आंबेडकर श्री 2024’ या भव्य विदर्भस्तरीय शरीर संस्था स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये विदर्भातील नामवंत बॉडीबिल्डर सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा वंचितांचा प्रकाश साप्ताहिकाचे संपादक व स्पर्धा आयोजक महेंद्र डोंगरे यांनी दिली.




शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत महेंद्र डोंगरे यांनी स्पर्धा आयोजन मागील भूमिका स्पष्ट करून आणि स्पर्धाची सविस्तर माहिती दिली.


यावर्षी ही स्पर्धा शनिवार 24 फेब्रुवारी रोजी संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे संध्याकाळी 7 वाजता  होणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत 50 बॉडी बिल्डरची नोंदणी झाली असून, यामध्ये अधिक स्पर्धक सहभागी होणार आहे. बाहेरगावहून येणाऱ्या स्पर्धकांची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांनी केली आहे,असे डोंगरे यांनी सांगितले.



आंबेडकर श्री 2024 हे टायटल प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाला 21,000 रोख, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. बेस्ट पोझर ठरणाऱ्या स्पर्धकाला 11,000 रोख, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. सोबतच प्रत्येक वजन गटात प्रथम, द्वितीय ,तृतीय आणि प्रोत्साहनपर 11000,7000, 5000, 3000, 2000 रोख ,आकर्षक स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. 


स्पर्धेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजली आंबेडकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे राहतील. यावेळी अशोक सोनवणे प्रदेशाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, जिल्हा सामान्य रुग्णालय अधीक्षक डॉ.मीनाक्षी गजभिये, डॉक्टर आशुतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी दारव्हा प्राध्यापक संजय खडसे, उपविभागीय अधिकारी अचलपूर बळवंत अरखराव, उद्योजक  पुष्कर ढवळे, तहसीलदार मलकापूर राहुल तायडे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके, समाज कल्याण अधीक्षक सुरेंद्र तिडके, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर समाधान कंकाळ, देऊळगाव राजाचे ठाणेदार संतोष महल्ले, क्रीडा अधिकारी सतीश भट, प्राध्यापक राजेंद्र डोंगरे अमरावती, सामाजिक कार्यकर्ते अनिल यादव, विदर्भ बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम गावंडे,  व्यापारी राहुल भगत आदी मान्यवर उपस्थित राहतील. 



अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष तथा वंचितांचा प्रकाश साप्ताहिकाचे संपादक व मुख्य आयोजक महेंद्र डोंगरे यांनी याप्रसंगी केले.



पत्रकार परिषदेला प्रा. राहुल माहुरे, ॲड. आकाश हराळ, विशाल नंदागवळी, आदित्य बावनगडे, प्रशिक मेश्राम, कुणाल डोंगरे, आर्यन मेश्राम, अमोल उके, प्रथमेश कठाणे आदी उपस्थित होते.


टिप्पण्या