amit-shah-maharashtra-tour : अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित; पुढील आठवड्यात येण्याची शक्यता, काहींना देणारं कानमंत्र तर काहींची करणार कान उघडणी !

  

  file image


 



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह हे अकोला मध्ये येणार होते. त्यांच्या स्वागताकरिता अकोला भाजपासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित झाल्याने भाजपा गटामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हा दौरा स्थगित होण्यामागील कारण अद्याप कळले नसल्याने राजकीय वर्तुळात उलट्या सुलट्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा स्थगित झाला, याबाबत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी दूजोरा दिला आहे. अमित शहा हे पुढील आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता   सूत्रांनी वर्तविली आहे.



आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष तयारीचा आढावा घेण्यासाठी अमित शाह यांचा १५ फेब्रुवारीचा महाराष्ट्रातील अकोला, औरंगाबादचा नियोजित दौरा स्थगित करण्यात आला आहे. आता ते १८ किंवा २२ फेब्रुवारी रोजी दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी  सांगितले.


जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला 


या भेटी दरम्यान अमित शाह हे भाजपसह शिंदे गटाचे खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा  आढावा घेणार आहेत. लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. तत्पूर्वी  पश्चिम विदर्भातील भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला लोकसभा मतदार संघात देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह १५ फेब्रुवारी रोजी येणार होते. मात्र, त्यांचा हा पूर्वनियोजित दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. आता ते १८ किंवा २२ फेब्रुवारीला महाराष्ट्रात येणार असल्याची शक्यता आहे.


विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ- वाशीम व वर्धा लोकसभा मतदारसंघाचा अमित शाह आढावा घेणार आहेत.  या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, २० संघटनमंत्री, विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सोबत ते प्रत्यक्ष चर्चा करुन काहीना कानमंत्र तर काहींची कान उघडणी करणार असल्याचे कळते. त्यामुळे अमित शाह यांच्या पुढील आठवड्यातील महाराष्ट्र दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.


टिप्पण्या