akot-court-news-reject-bail-akl : आजीबाईची अब्रू लुटणाऱ्या आरोपीचा जमानत अर्ज न्यायालयाने फेटाळला

  file images 



 

भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: माणुसकीला काळीमा फासणारी घटना पाटसुल गावामध्ये डिसेंबर 2023 रोजी घडली होती. यामध्ये नातवाच्या वयाच्या इसमाने 82 वर्षीय वयोवृद्ध महिलेला घरात घुसून अमानुष मारहाण करून तिच्यावर बळजबरी केली होती. याप्रकरणी आरोपीने न्यायालयात जमानत अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायलयाने आरोपीचा हा अर्ज आज नामंजूर केला आहे.


अकोट येथील जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी दहिहांडा पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. 372/2023 भा.दं.वि.  कलम 376, 452, 323, 506 मधील आरोपी शैलेश अरुण वाघोडे (वय 38 वर्षे धंदा शेती राहणार पाटसुल ता. अकोट, जि. अकोला) याने 82 वर्षीय वयोवृध्द महिलेवर अमानवीय कृत्य केल्याने प्रकरणात दाखल केलेला जमानत अर्ज आज 27 फेब्रुवारीला फेटाळला (नामंजूर) आहे. 



या प्रकरणात 82 वर्षीय वृध्द महिलेने आरोपी शैलेश वाघोडे, राहणार पाटसुल, दहिहांडा पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यावरून गुन्हा 28/12/2023 रोजी दाखल करण्यात आला होता.  त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली असुन, आरोपी तेव्हा पासुन अकोला कारागृहात बंदीस्त आहे.




आरोपी शैलेश वाघोडे याने 82 वर्षीय फिर्यादी महिलेच्या घरामध्ये रात्री 8 वाजताचे दरम्यान जबदरस्तीने प्रवेश करून घर बंद केले. वयोवृध्द फिर्यादीला अमानुष मारहाण करून तिच्यावर बळजबरी केली. या प्रकरणात वयोवृध्द फिर्यादी महिलेची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. तसेच फिर्यादी महिला ही विधवा आहे. आरोपी हा तिच्या शेजारी राहणारा आहे. या प्रकारामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे. आरोपी हा अतिशय हिन मानसिकतेचा असुन त्याने केलेले कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. आरोपीला जामीनावर सोडल्यास तो फिर्यादी व इतर साक्षीदारावर दबाव टाकण्याची शक्यता आहे. तसेच आरोपी जामीनावर सुटल्यास त्याचे मनोधैर्य वाढेल आणि तो अशाच प्रकारचे गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे व त्यामुळे आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करण्यात यावा व त्याला कारागृहातच बंदीस्त ठेवण्यात यावे, असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात केला.  दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायलयाने आरोपीचा जमानत अर्ज नामंजूर केला आहे. 



या प्रकरणाचा तपास दहिहांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरूण मुंढे करीत आहेत.

टिप्पण्या