akola-police-special-patrol: आता अकोला जिह्यात वर्दळीच्या ठिकाणी आणि संवेदनशील भागात पोलीस देणार कडा पहारा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी शुक्रवारी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता प्रभावी पट्रोलींग व प्रतिबंधक कार्यवाहीवर भर देण्यात आला. यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात वर्दळीचा ठिकाणी आणि संवेदनशील भागात पोलीस कडा पहारा देणार आहेत.



पोलिस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन वर्दळीचा ठिकाणी नव्याने प्राप्त १६ बाइक व्दारे विशेष पट्रालींग, संवेदनशिल ठिकाणी फिक्स पॉईंट, अँटी दरोडा पट्रोलिंग, पायी पट्रोलींग, दामीनी पथक पट्रालींगवर भर देण्यात आला. तसेच निवडणूकीचा पार्श्वभुमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एम.पी.डी.ए., तडीपारी इ. प्रतिबंध कारवाई वर भर द्यावा, अश्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच महीनाभरात गुन्हा शोध, दोषसिध्दी, प्रतिबंधक कार्यवाही यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे ६९ पोलीस अधीकारी, अमंलदार यांचा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. 




पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांनी अकोला जिल्हयातील सर्व ठाणेदार यांची पोलीस अधिक्षक कार्यालय, अकोला येथे ०२.०२.२०२४ रोजी मासीक गुन्हे आढावा बैठकीत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्या गुन्हयांचा आढावा घेतला. शहरात व ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर आळा बसावा व महीला व मुली तसेच विदयार्थी यांचे मध्ये सुरक्षितेची भावना वाढावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस मदत मिळावी आणि सर्व सामान्य जनतेमध्ये पोलीसांची प्रतिमा चांगली व्हावी, या करीता पोलीस अधिक्षक यांनी २४ नविन मोटर सायकली प्राप्त करून घेतले. 


विशेष पट्रोलिंग



शहरामध्ये संवेदनशिल ठिकाण निश्चीत करून त्याठिकाणी ०५ मोटार वाहन फिक्स पॉईंट लावण्यात आले. तसेच दररोज सकाळी ०६.०० ते ०९.०० व सायंकाळी १८.०० ते २३. ०० वाजे दरम्यान नव्याने प्राप्त अत्याधुनिक मोटार सायकल व्दारे विशेष पट्रोलिंग सुरू करण्यात आली. 


टवाळखोरांना बसणार आळा


शहर व ग्रामीण भागातील सर्व ठाणेदार यांना पोलीस स्टेशन हद्दीत टवाळखोरांना आळा घालण्यासाठी दामीनी पथक पेट्रोलींग करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच दररोज संध्याकाळी १९.०० ते २१.०० वा. दरम्यान पोलीस अधिकारी/अमंलदार यांची पायी पट्रोलींग व १८.०० ते २३.०० वाजे पावेतो बाईक पट्रोलींग प्रभावीपणे करण्या बाबत आदेशित केले. तसेच शहरात व ग्रामीण भागात जास्तीत जास्त पोलीस अमंलदार लावुन प्रभावी पणे रात्रगस्त करण्या बाबत आदेशित केले आहे.  


डायल ११२ योजना


नव्यानेच अन्टी दरोडा पेट्रोलिंग कामी ०२ वाहनांची नेमणुक करण्यात आली. डायल ११२ हि योजना प्रभावी पणे राबविण्याबाबत सुचना देण्यात आल्या.


 

लोकसभा निवडणुकीसाठी खबरदारी 

आगामी लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व ठाणेदार यांना गुन्हेगारीचे वृत्तीचे लोकांन विरूध्द मोक्का, एम.पी.डी.ए. तडीपार, ईतर प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले.  


अधीकारी व अंमलदार यांचा गौरव 


अकोला जिल्हयात जानेवारी २०२४ मध्ये गुन्हा शोध, दोषसिध्दी, प्रतिबंधक कार्यवाही यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे ६९ पोलिस अधीकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.



दामिनी पथक घालणार गस्त 


दामीनी पथक गस्त मुळे विशेषता महीला व मुलींमध्ये सुरक्षितेची भावना तसेच विदयार्थामध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होवुन मुली व महीला विषयी होणारे गुन्हयांना प्रतिबंध होईल. पायी पेट्रोलींग व गरूड बाईक पेट्रोलींग, व रात्रगस्त गस्त पेट्रोलींग मुळे गुन्हेगारीला आळा बसुन प्रतिबंध होणार आहे. व जनतेस पोलीसांचा जलद प्रतिसाद मिळण्यास मदत होईल. जनता व पोलीस यांचे संबंध वृध्दींगत होण्यास मदत होणार आहे. पोलीसांच्या या पट्रोलिंग व ईतर उपक्रमांचे जनतेतुन स्वागत होत आहे.



टिप्पण्या