Akola Municipal Corporation: अकोला महानगरपालिकेच्या सुसज्ज्ञ प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध; पालकमंत्री ना.विखे पाटील यांची अकोलेकरांना भेट







ठळक मुद्दे 

*महानगरपालिका इमारती उभारणीचं काम लवकरच होणार सुरू 

*भाजपा लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल 





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला महानगर पालिकेच्या  अद्यावत व सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग प्रशस्थ झाला असून, अकोला महानगरपालिका प्रशासकीय इमारती करीता नझुल शिट क्र.  ५२ भुखंड क्र. ११/१, क्षेत्रफळ १५८५१६ चौ.फुट (१४७३२ चौ.मी.) जागा विनामूल्य  उपलब्ध  करून देण्याचे ज्ञापन प्रसारित केले आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस – आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.



राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच महसूल अधिकाऱ्यांचे आणि मनपा जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा अभिनंदन आभार व्यक्त करून अकोलाच्या नागरिकांना दिलेल्या अभिवचनाची पूर्ततेकडे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया आमदार सावरकर यांनी यावेळी दिली.



अकोला महानगर पालिकेची हद्दवाढ झाल्याने पालिका क्षेत्राची वाढ लक्षात घेता महानगर पालिकेची अद्यावत व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. तथापि इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध नसल्याने तसेच महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने अकोला महानगरपालिकेच्या  प्रशासकीय इमारती करीता नझुल शिट क्र.  ५२ भुखंड क्र. ११/१, क्षेत्रफळ १५८५१६ चौ.फुट (१४७३२ चौ.मी.) जागा विनामूल्य  उपलब्ध  करून देण्यात यावी या करिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे तत्कालीन पालक मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे आमदार रणधीर सावरकर यांनी मागणी केली होती. माजी केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे यांनी अकोला शहराचे लोकप्रतिनिधी यांना या बाबत सक्षम पाठपुरावा करण्यासोबतच शासन स्तरावर मागणी रेटून धरली होती. स्व. आमदार गोवर्धन शर्मा यांचा या प्रकरणी असलेला सततचा पाठपुरावा तसेच अकोला महानगर पालिकेचे माजी महापौर विजय अग्रवाल व माजी महापौर अर्चना मसने याचे प्रयत्न अशा सर्वांच्या प्रयत्नांची फलश्रुती होऊन अकोला महानगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या जागेसाठी शासनाकडून विना मोबदला जमीन उपलब्ध करून दिली आहे.



राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्णविखे पाटील यांनी अकोलावासीयांची मागणी पूर्ण केली असून, सदर इमारतीसाठी  जागा विनामूल्य  उपलब्ध  करून देण्याचे ज्ञापन प्रसारित केले आहे.  सदर मागणी प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी नझुल शिट क्र. ५२ भुखंड क्र. ११/१, क्षेत्रफळ १५८५१६ चौ.फुट (१४७३२ चौ.मी.) जागेची मागणी करण्यातच आलेली आहे. सदर जमीनीच्या मोबदल्यापोटी महसुल विभागाकडून सदर जागेचे मुल्यांकन काढण्यात आले असून, त्यानुसार अकोला महानगरपालिकेला ४७.१४ कोटी रुपयांची मागणी केलेली होती.  परंतू अकोला महानगरपालिकेची कमकुवत आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उक्त आलेली मुल्यांकनाची रक्कम महानगरपालिकेस भरणा करणे शक्य होत नाही, अशा आशयाची मागणी आमदार रणधीर सावरकर यांचेकडून शासनाकडे करण्यात आलेली होती. 

या मागणी प्रस्तावास तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे  पालक मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता देण्यासाठी शासनाला निर्देश दिले होते.  सदर मागणीवर पूर्तता विद्यमान महसूल मंत्री तथा पालकमंत्री अकोला ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतिम मोहोर लावली.




आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला शहरवासियांचे वतीने सर्वांप्रती आभार व्यक्त केले. अकोला महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असेलली उपरोक्त जागा महापालिकेला विनामुल्य उपलब्ध करण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी अकोला यांनी विषयांकीत प्रस्ताव अप्पर सचिव, महसुल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार अकोला महानगरपालिका प्रशासकीय इमारती करीता जागा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यासोबतच सदर जागेचा आगाऊ ताबा अकोला महानगरपालिकेस  घेण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

टिप्पण्या