Akola crime: शाळेच्या छतावर आढळले मृत अर्भक; परिसरात खळबळ





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: उमरी रोड वरील रतनलाल प्लॉट स्थित जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या छतावर रविवारी दुपारी मृत अर्भक आढळल्याने अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे.  क्रिकेट खेळणाऱ्या तरुणाचा चेंडू अचानक शाळेच्या टेरेसवर गेल्याने ही घटना समोर आली आहे. 



पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, सिव्हिल लाइन्सचे एसएचओ व सर्व उच्चपदस्थ अधिकारी व एलसीबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.




सदर घटनेत चार भ्रूण आढळून आल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र तपासणी केली असता हा एकच अर्भक होता व इतर अवशेष असल्याचे समोर आले. 



पोलीसांनी घटनेची दखल घेवून परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपास करीत आहेत. तसेच येथे आढळलेले अर्भक व काही मासाचे तुकडे हे वैद्यकिय तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर याबाबात अधिक माहिती मिळू शकेल,असे सुत्रांनी म्हंटले आहे.




दरम्यान, या शाळेसाठी वॉचमन नेमण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून होत आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आता मृत अर्भक आढळल्याने  रुग्णालय प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारण जवळच जिल्हा स्त्री रूग्णालय आणि इतर खासगी रुग्णालय आहेत.







टिप्पण्या