war-tank-akola-city-indo-pak: 1971 च्या युद्धातील लढाऊ रणगाडे राज राजेश्वर नगरीत; खासदार संजय धोत्रे यांची इच्छापूर्ती






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विश्वाला शिकवण देणारे राजे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून राज राजेश्वर नगरीमध्ये 1971 मधील भारत पाकिस्तानच्या युद्धातील साक्षीदार असलेले लढाऊ रणगाडे आणण्यात आले. हे रणगाडे प्रजासत्ताक दिनाला पत्रकार चौकात विराजमान कऱण्यात आले आहे.



देशभक्ती व देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा गौरव व त्यांची शौर्यगाथा नव्यापिढीला माहिती व्हावी, यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी 1971 मधील युद्धात पाकिस्तान सैनिकांना धडा शिकवणारा रणगाडा राज राजेश्वर नगरीत आणण्याचा प्रयत्न केला होता. आज या प्रयत्नांना यश आले आहे.





एतिहासिक वारसा जपण्यासाठी, संस्कृती आणि संस्कारासोबत चौकाचे सौंदर्यात भर घालण्यासाठी हे रणगाडे उपलब्ध झाले आहे. आज प्रजासत्ताक दिन व देशाच्या अमृत महोत्सव निमित्त अकोल्यात रणगाडे आल्याबद्दल हजारो राष्ट्रभक्त स्वागतासाठी उपस्थित झाले. अश्या देशभक्तीला नमन असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी अकोला लोकसभा प्रमुख भाजपा अनुप धोत्रे यांनी केले. 



स्थानिक बाबासाहेब आंबेडकर चौक पासून तर पत्रकार चौक पर्यंत रणगाडाचे ठीकठिकाणी मातृशक्तीने पूजन करून पुष्पवृष्टी केली . ठिक ठिकाणी रांगोळी काढून आतिषबाजी करून ढोल नगाऱ्यांनी परंपरागत वाद्यांनी रणगाड्याचे पूजन करून स्वागत केले.  



कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर  होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर विजय अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, अर्चना मसने उपस्थित होते. 


रणगाडा घेऊन येणारे भाजप कार्यकर्ते , मनपा अधिकाऱ्यांचे स्वागत पूजन करण्यात आले. अतुल विखे, धीरज पाडिया यांचे स्वागत तसेच ड्रायव्हर अरविंद सावंत यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले. 



लष्कर अधिकारी गजानन पेठे, रमेश वालकुली, रामेश्वर वालकुली या अधिकाऱ्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारा T-55 लढाऊ रणगाडा आता येथील पांगोडे मिलिटरी स्टेशनमधील मौल्यवान वस्तूंपैकी एक आहे. स्टेशन कमांडर ब्रिगेडियर ललित शर्मा यांनी सोमवारी जगातील प्रमुख रणगाड्यांपैकी एक T-55 रणगाड्यांच्या भूमिकेचे स्मरण करण्यासाठी आणि भारतीय सैन्यासह त्यांच्या दीर्घ वर्षांच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी युद्ध ट्रॉफीचे उद्घाटन केले. 1966 मध्ये भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आलेले, T-55 हे त्यावेळच्या जगातील सर्वात आधुनिक युद्ध रणगाड्यांपैकी एक होते. हे प्रामुख्याने पूर्व युरोपमधील सोव्हिएत राष्ट्रांकडून खरेदी केले गेले. 1968 मध्ये, भारताने 225 T-55 टाक्यांच्या पुरवठ्यासाठी USSR सोबत करार केला. T-55 मे 2011 पर्यंत भारतीय सैन्याच्या आर्मड फॉर्मेशन्सच्या सेवेत होते आणि 1971 च्या बांगलादेश मुक्ती युद्धात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यानंतर ते स्वदेशी उत्पादित MBT-विजयंताने बदलले गेले, ज्याची T-55 पेक्षा चांगली वैशिष्ट्ये असलेला रणगाडा उपलब्ध करून दिला त्यांचे सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी अकोलेकरांच्या वतीने स्वागत केले. 



मनपा आयुक्त  कविता त्रिवेदी व अभियंता अजय गुजर यांचे सुद्धा स्वागत केले. यावेळी अनुप धोत्रे, किशोर पाटील, अर्चना मसने, विजय अग्रवाल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर गिरीश जोशी यांनी पौरहित्य  केले. भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी नाऱ्यांनी पत्रकार चौक  दुमदुमले. तेल्हारा शहरात सुद्धा रणगाडा उपलब्ध करून देण्यात आला आहे. 





यावेळी आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, किशोर  मांगते पाटिल, अर्चना मस्ने,अनूप  धोत्रे, संजय गोटफोडे, माधव मानकर,चंदा शर्मा ,देवाशीष काकड़,पवन महल्ले  ,चंदा ठाकुर, छाया तोड़ासम, जानवी डोंगरे, अजय शर्मा, मनोज साहू ,लाला जोगी , रविता शर्मा , दीपिका ठाकुर, संतोष शर्मा, राजेंद्र गिरी, रमेश करियर ,हरीश अलिमचंदानी, सागर शेगोकर ,बाल टाले, संजय झाड़ोकर, विजय ठाकुर , नितीन राउत, महेश गोंदेकर ,राहुल चौरसिया, प्रशांत अवचार,कृष्ण पांडे, प्रकाश धोगलीया गणेश तायड़े, किशोर कुचके, अक्षय जोशी डॉक्टर अमित कावरे ,संतोष डोंगरे ,गोपाल मुले, कुणाल शिंदे,राजेश वगरे, रितेश जमनारे, अभिजीत कडू, अतुल गोमासे, शुभम चंदन, हर्ष चौधरी ,चेतन तावरी, बाबा पांडे, अभिषेक भगत, विजय तोड़सम ,जाकिर खान ,फिरोज खान, दिलीप मिश्रा, सिद्धार्थ शर्मा, सुनील कांबळे, टोनी जयराज, राजेंद्र चौधरी शितल जैन सह कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तसेच ट्रॅफिक कंट्रोल करण्याचे काम करण्यात केले . दोन तास ट्राफिक जाम झाली होती. नागरिकांनी वाहतूक थांबवुंन रणगाड्याचे स्वागत केले. 

टिप्पण्या